Grenade Attack on CRPF Bunker: श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 10 हून अधिक नागरिक जखमी
याचाचं फायदा घेत दहशवाद्यांनी याठिकाणी ग्रेनेड हल्ला केला. हल्ल्यानंतर काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप तपासासाठी तैनात करण्यात आले आहे.
Grenade Attack on CRPF Bunker: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmi) च्या श्रीनगर (Srinagar) मध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी ऑल इंडिया रेडिओ स्टेशन (All India Radio Station) च्या बाहेर सीआरपीएफ बंकरवर ग्रेनेड हल्ला (Grenade Attack) केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी रविवारच्या बाजारात गर्दी असलेल्या पर्यटक स्वागत केंद्राजवळ (TRC) ग्रेनेड फेकले.
श्रीनगरमधील लाल चौकात भरणाऱ्या आठवडी बाजारात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होते. याचाचं फायदा घेत दहशवाद्यांनी याठिकाणी ग्रेनेड हल्ला केला. हल्ल्यानंतर काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप तपासासाठी तैनात करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीमही सुरू करण्यात आली आहे. (हेही वाचा -Grenade Attack In Srinagar: श्रीनगरमध्ये बाजारपेठेच्या मध्यभागी दहशतवाद्यांनी फेकला ग्रेनेड, एकाचा मृत्यू तर 20 जण जखमी)
श्रीनगरमधील खनियार भागात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उस्मान भाई मारला गेला होता. आयजीपी काश्मीर व्हीके बिर्डी यांनी लष्कर कमांडर उस्मानच्या हत्येला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, उस्मान दहशतवादाशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये सामील होता. गैर-काश्मीरी आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. इन्स्पेक्टर मसरूर यांच्या हत्येतही त्याचा हात होता. (हेही वाचा - Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांच्या तळाचा पर्दाफाश; हँडग्रेनेड आणि माइन्स जप्त, शोध मोहीम सुरूच)
श्रीनगरमधील खानयार येथील चकमकीत चार सुरक्षा कर्मचारी जखमी -
दरम्यान, शनिवारी सकाळी श्रीनगरमधील खानयार भागात झालेल्या चकमकीत चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी खानयार परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेला दहशतवादी पाकिस्तानी असून तो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता.