Leander Paes joins TMC: दिग्गज टेनीसपटू लिएंडर पेस यांचा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश; ममता बॅनर्जी यांच्याकडून स्वागत

हा पक्षप्रवेश गोव्यात पार पडला. तृणमूल काँग्रेसने (TMC) आपल्या ट्विटर हँडलवरुन या पक्षप्रवेशाची घोषणा केली.

Leander Paes joins TMC | (Photo Credit Twiiter/ANI)

लिएंडर पेस (Leander Paes) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश गोव्यात पार पडला. तृणमूल काँग्रेसने (TMC) आपल्या ट्विटर हँडलवरुन या पक्षप्रवेशाची घोषणा केली. तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, 'आम्ही सर्व एकत्र येऊन हे निश्चित करु की, भारताली प्रत्येकजण तो क्षण पाहू शकेल. ज्याची 2014 पासून प्रतिक्षा आहे.' लिएंडर पेस हे दिग्गज टेनिसपटू आहेत. त्यांनी ऑलंम्पिक खेळांमध्ये टेनिस एकेरी स्पर्धेत कास्यपदकही जिंकले आहे. टेनिसच्या दुहेरी सामन्यात महेश भूपती यांच्यासोबत लिएंडर यांच्या जोडीने चांगली कामगिरी केली आहे.

लिएंडर पेस हे टेनिसपटू आहेत. ते अलिकडे दुहेरी आणि मिश्र दुहेरी स्पर्धेत सहभागी होतात. ते भारतातील एका सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊनही त्यांना 1996-1997 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव केंद्र सरकारने अलिकडे बदलून ते मेजर ध्यानंचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे. लिएंडर पेस यांना 20099 मध्ये पद्मश्रीआणि 2014 मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लिएंडर पेस यांचा जन्म 17 जून 1973 मध्ये कोलकाता येथे झाला आहे. (हेही वाचा, ममता दीदी यांचा शब्द म्हणजे जणू संगीतच, Babul Supriyo यांची Mamata Banerjee भेटीनंतर प्रतिक्रिया)

ट्विट

लिएंडर पेस यांच्या प्रमाणेच अभिनेत्री नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभु यांनीही ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितित तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. ममता बॅनर्जी या गोव्यामध्ये आपला पक्ष मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपचा जोरदार पराभव केला. या पराभवानंतर आता त्यांचा पक्ष गोव्यात जनमत आजमावू पाहतो आहे. उल्लेखनीय असे की, गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आहे.