Temples Renovation in india: तिरुपती मंदिर ट्रस्टकडून होणार तब्बल 57 हजार मंदिरांचे नूतनीकरण; International Temple Connect Expo मध्ये दिली माहिती

या अधिवेशनात एकूण 450 प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापक उपस्थित होते. आपल्या भाषणात संघ प्रमुखांनी सर्व मंदिरांच्या एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला.

Tirupati Temple | Image Used for Representational Purpose (Photo Credit: PTI)

तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट (TTDT) भारतामधील दक्षिणेकडील तब्बल 57,000 मंदिरांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेणार आहे. यासाठी ट्रस्टने स्वतंत्र पायाभूत सुविधा निधी तयार केला आहे. वाराणसी येथे आयोजित इंटरनॅशनल टेंपल कनेक्ट एक्सपो (ITCEx) मध्ये, तिरुपती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण भारतातील मंदिरांचे नूतनीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचे वचन दिले.

त्यांच्या मते, लवकरच एक मोहीम सुरू केली जाईल ज्यामध्ये दक्षिण भारतातील विविध ठिकाणच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाईल. दोन दिवस चाललेल्या या एक्स्पोचा रविवारी समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघRRs)  (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनाला संबोधित केले, ज्यामध्ये देश-विदेशातील मंदिरे चालवणारे आणि व्यवस्थापित करणारे हजारो लोक उपस्थित होते.

वाराणसी येथील या अधिवेशनात गुरुद्वारा आणि जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. या अधिवेशनात एकूण 450 प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापक उपस्थित होते. आपल्या भाषणात संघ प्रमुखांनी सर्व मंदिरांच्या एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला आणि सांगितले की देशातील हिंदू धार्मिक स्थळांची योग्य यादी करण्याची वेळ आली आहे. देशातील मंदिरांचे सर्वेक्षण व्हायला हवे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: आंध्रप्रदेशातील Kurnool मध्ये भगवान श्रीरामाच्या 108 फुटी पुतळ्याची पायाभरणी संपन्न; भारतातील हा श्रीरामांचा सर्वात उंच पुतळा)

ते पुढे म्हणाले की, खेड्यातील आणि रस्त्यांवरील मंदिरे यादीत असणे आवश्यक आहे आणि मोठ्या प्रार्थनास्थळांऐवजी लहान मंदिरांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, लहान मंदिरांच्या देखभालीसाठी मदतीची गरज आहे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे. निमंत्रक, गिरीश कुलकर्णी म्हणाले की, भारतात सुमारे 22-23 लाख मंदिरे आहेत आणि त्यांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. लहान मंदिरांचा विकास करण्यासाठी मोठ्या मंदिरांनी पुढे यावे. आजपर्यंत 97 देशांतील 9,782 मंदिरे डिजिटल पद्धतीने जोडली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.