Indian Men Imprisoned in UAE Return: दुबईमध्ये तुरुंगवास, तेलंगणातील 5 जणांची 18 वर्षांनंतर सुटका, कुटुंबीयांशी भेटीचा Heart Touching Video
जवळपास दोन दशकांपासून दुबई (Telangana Men Jailed in Dubai) येथे अडकून पडलेल्या पाच भारतीयांची यशस्वी सुटका झाली आहे. या पाचही जणांना दुबई येथे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. बीआरएस नेते केटी रामाराव यांच्या अथक प्रयत्नांमुळेया सर्वांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला.
Heart Touching Video Of Telangana Men: जवळपास दोन दशकांपासून दुबई (Telangana Men Jailed in Dubai) येथे अडकून पडलेल्या पाच भारतीयांची यशस्वी सुटका झाली आहे. या पाचही जणांना दुबई येथे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. बीआरएस नेते केटी रामाराव यांच्या अथक प्रयत्नांमुळेया सर्वांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. कुटुंबातील सदस्यांसह पुनर्मिलन होताना क्षण अत्यंत भावूक होता. या भावूक क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. भारतात परतलेले पाचही जण हे तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार, हे पाच जण कामानिमित्त दुबईला गेले होते. मात्र, दुबई येथे एका नेपाळी नागरिकाची हत्या केल्याचा या पाचही जणांवर आरोप होता. धक्कादायक त्यांचे निर्दोषत्व कामय असतानाही त्यांना 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यापैकी 18 वर्षांची शिक्षा त्यांनी पूर्ण केली.
सुटका झालेल्या पाच जणांची नावे
दुबईतून भारतात परतलेल्या पाच जणांची नावे शिवरात्री मल्लेश, शिवरात्री रवी, गोलेम नामपल्ली, डुंडुगुला लक्ष्मण आणि शिवरात्री हनमंथू अशी आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. नोकरी आणि कामधंद्याच्या शोधात हे सर्वजण दुबईला गेले होते. दरम्यान, त्यांचे नाव एका हत्याप्रकरणाशी जोडले गेले आणि त्यांना दीर्घकालीन तुरुंगवासाची शिक्षा झाली. याबाबत बीआरएस नेते केटी रामाराव यांना मिळाली. केटी रामराव हे केटीआर नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी या पाच जणांच्या सुटकेबाबत प्रयत्न सुरु केले. सन 2011 पासून हे प्रयत्न सुरु होते. त्यांनी नेपाळ यथील पीडिताच्या कुटुंबाची सद्भावना भेट घेतली. त्यासाठी त्यांनी 15 लाख रुपयंची आर्थिक भरपाई देऊ केली. (हेही वाचा, कतारमधील नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी Shah Rukh Khan याचा हात, PM मोदी यांनी काहीच नाही केले, Subramanian Swamy यांचा दावा)
भाषीक अडथळा दूर करुन संपर्क
दुबईसरकारशी बोलताना केटी रामाराव यांना अनेक भाषीक अडथळेही निर्माण झाले होते. त्यातच तुरुंगात असलेल्या या पाच जणांनाही भाषीक अडथळा मोठा आहे. त्यांनी अपील करूनही, त्यांची माफीची याचिका सुरुवातीला दुबई न्यायालयाने फेटाळून लावली, ज्यामुळे त्यांचा तुरुंगवास वाढला. (हेही वाचा, Manipuri Children Rescued from Maharashtra School: नाशिकच्या शाळेतून मणिपूरमधील पाच मुलांची सुटका; अत्याचाराचा आरोप, एकास एअर गनने दुखापत)
व्हिडिओ
दरम्यान, दुबईच्या कायद्यांची पुनरावृत्ती झाली तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी आशेचा किरण दिसू लागला आणि एक निर्णायक क्षण आला. गेल्या सप्टेंबरमध्ये मंत्री केटीआर यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पाठिंब्याने दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना वाटाघाटींचे अवाहन केले. काही आठवड्यांच्या वाटाघाटीनंतर, पाच जणांची दयेची याचिका मंजूर करण्यात आली, ज्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका झाली. सोशल मीडियावर या व्हिडिओने अनेकांना भावूक केले आहे. अनेकांनी या सुटकेबाबत आनंद व्यक्त केल आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)