Tejashwi Yadav On Enforcement Directorate: तेजस्वी यादव यांचे ईडीला निमंत्रण, 'या माझ्या घरी मुक्काम करा'

तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमार यांच्यासोबत आघाडी करुन बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार नव्याने स्थापन केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Tejashwi Yadav |

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थाच ईडीला थेट निमत्रण दिले आहे. तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमार यांच्यासोबत आघाडी करुन बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार नव्याने स्थापन केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबतची आघाडी तोडून पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत जाणे पसंत केले. त्यामुळे बिहारमध्ये राजद आणि जेडीयु यांचे संयुक्त सरकार काँग्रेससह सात पक्षांच्या मदतीने सत्तेत आले आहे. या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहेत. अशा स्थितीत सध्या देशभर चर्चेत असलेली ईडी काय भूमिका घेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

देशभरात ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप विरोधी सराकरे सत्तेत आहेत त्या ठिकाणी ईडी, सीबीआय किंवा तत्सम केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडत असतात. प्रामुख्याने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हे दिसून आले. आता बिहारमध्ये सत्तांतर झाले आहे. त्यामुळे बिहारमध्येही अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी अशाच पद्धतीने सक्रीय होणार का? याबाबत उत्सुकता आहे. एनडीटीव्हीने एका मुलाखतीदरम्यान, तेजस्वी यादव यांना याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला. उत्तरादाखल तेजस्वी म्हणाले, त्यांना (ईडीला) यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही इथे एक ऑफीस उघडू शकतो. त्यांनी कृपया यावे आणि जेवढा वेळ राहायचे आहे तेवढा वेळ राहावे. त्यांनी माझ्या घरात ऑफीस उघडायला पाहिजे. मी आपल्या माध्यमातून त्यांना निमंत्रणच देतो. ईडी सीबीआय, ईनकम टॅक्स यांनी कृपा करुन आमच्याकडे यावे आणि जितका वेळ हवे तेवढे दिवस मुक्काम करावा. (हेही वाचा, National Democratic Alliance: नीतीश कुमार यांच्या भूमिकेमुळे NDA ला धक्का, राज्यसभेत भाजप अडचणीत)

दरम्यान, तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे सहाजिकच आगामी काळात ईडी त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेजस्वी यादव यांनी आरोप केला आहे की, केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या आयटी सेलप्रमाणे काम करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif