तोंडात बोळा कोंबून ८० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार, अल्पवयीन आरोपीस ग्रामस्थांचा चोप; बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील घटना
Rape Case | (Photo credit: archived, edited, representative image)

बिहार (Bihar) राज्यातील मधुबनी (Madhubani) जिल्ह्यात एका 80 वर्षीय वृद्धेच्या तोंडात बोळा कोंबून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन आहे. ही घटना रात्रीच्या अंधारात घडली. महिलेने आरडाओरडा करु नये यासाठी आरोपीने तिच्या तोंडात बोळा कोंबून हा प्रकार केला. दरम्यान, वृद्धेने आरडाओरडा केला. वृद्धेचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आरोपीला रंगेहात पकडले आणि त्यास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीस अधिकक्षक सत्यप्रकाश यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना (गुरुवार, 11 जुलै) सांगितले की, पीडित महिला बुधवारी (10 जुलै) घरात झोपली होती. दरम्यान, अल्पवयीन आरोपी पीडितेच्या घरात घुसला. त्याने पीडितेसोबत जबरदस्ती केली. पीडितेची वैद्यकीय चाचणी केरण्यात आली असून, चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे. तर, पोलीसांनी अल्पवयीन आरोपीस घटनास्थळावरुन ताब्यात घेतले आहे. आरोपीस रिमांड होममध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. माहिती देताना पोलीसांनी म्हटले की, आरोपीने हे कृत्य करताना महिलेच्या तोंडात बोळा कोंबला. जेणेकरुन तिने आरडाओरडा करु नये. (हेही वाचा, Pomeranian कुत्रीवर सामूहिक बलात्कार, तीन पुरुषांना अटक; Female Dog च्या अंगावर जखमा, प्रकृती गंभीर)

अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महिला रात्रीच्या वेळी घरात झोपली असताना आरोपीने हे कृत्य केले. हे कृत्य घडत असताना पीडिता आरोपीस विरोध करत आरडाओरडा करु लागली. या वेळी आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. ते पाहून आरोपी पळू लागला. पण, नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.