Lok Sabha Elections 2019: शताब्दी एक्सप्रेसमध्ये आढळले 'मैं भी चौकीदार' नावाने चहाचे कप, ठेकेदार आणि निरिक्षकावर कारवाई
जनशतब्दी एक्सप्रेस मध्ये चहाच्या कपवर मैं भी चौकीदार नाव दिसून आल्यावर वाद निर्माण झाला.
Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (RahulGandhi) यांनी 'चौकीदार चोर' असल्याचा नारा बऱ्याच वेळा दिला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राहुल गांधी यांच्या या टीकेचे प्रतिउत्तर देत 'मैं भी चौकीदार' अशी नवीन मोहिम सुरु केली असून सोशल मीडियावर याच नावाचे अकाउंट सुरु ठेवण्यात आले आहे. परंतु आता जनशतब्दी एक्सप्रेस मध्ये चहाच्या कपवर मैं भी चौकीदार नाव दिसून आल्यावर वाद निर्माण झाला.
खरेतर काठगोदाम शताब्दी एक्सप्रेस मधील प्रवाशांना मैं भी चौकीदार नावाने असलेले चहाचे कप देण्यात आले. यामुळे एका प्रवासाने अशा पद्धतीचे कप प्रवाशांना दिल्यामुळे तक्रार केली. तर आता रेल्वे प्रशासनाने या कपवर बंदी घातली आहे. परंतु अद्याप निवडणुक आयोगाने याबद्दल कोणताही निर्णय घेतला नसून याचा पक्षासोबत कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच संकल्प फाऊंडेशन तर्फे हे कप प्रवाशांना चहासाठी देण्यात आले आहेत.(हेही वाचा-नरेंद्र मोदी यांच्या 'मैं भी चौकीदार' प्रचार मोहीमेकडे 3.20 लाख बँक कर्मचाऱ्यांनी फिरवली पाठ)
तर रेल्वे प्रशासनाने ठेकेदार आणि निरिक्षकावर कारवाई केली आहे. तसेच तातडीने रेल्वे प्रशासनाने हे कप सेवेतून हटवण्याचे आदेश दिले आहेत.