Tata Trusts 5 कोटी रुपये शिल्लक अनुदान देणार असल्याने तूर्तास 115 कर्मचार्यांची कपात टळली मात्र यापुढे TISS सोबत नसणार!
TISS जून 2023 पासून टाटा ट्रस्टच्या व्यवस्थापनाखाली नाही.
देशात Tata Institute of Social Sciences च्या चार कॅम्पस मध्ये 100 कर्मचार्यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. पण आता ही नोकर कपात मागे घेण्यात आल्याचं एका नोटीस द्वारा सांगण्यात आले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने स्पष्ट केले की नोकर कपातीचं कुर्हाड कोसळलेले टाटा एज्युकेशन ट्रस्ट (टीईटी) द्वारे निधी पुरवलेल्या कार्यक्रमांतर्गत विशिष्ट कार्यक्रम कालावधीसाठी कराराच्या आधारावर काम करणारे होते. मात्र आता या कर्मचार्यांच्या पगारासाठी निधी दिला जाणार असल्याने ही नोकरकपात मागे घेण्यात आली आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. संस्थेला TET कडून दिले जाणारे अनुदान प्राप्त होताच पगार जारी केला जाईल असेही म्हटलं आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), 1936 मध्ये सुरू झालेली डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. भारत सरकारच्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) द्वारे पूर्ण अर्थसहाय्यित असून सध्या TISS सोसायटीद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार शासित आहे. नक्की वाचा: TISS मध्ये 100 कंत्राटी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना नोकरीवरून काढले; निधी अभावी कपात केल्याचा अहवाल.
इथे पहा नोटीस
टाटा ट्रस्टच्या सूत्रांच्या माहितीप्रमाणे TISS ने धर्मादाय प्रमाणपत्र जारी केल्यास 5 कोटी रुपये शिल्लक अनुदान देण्याचे मान्य केले आहे. "TISS ने आजपर्यंत प्रमाणपत्र दिलेले नाही. असे असूनही, टाटा ट्रस्टने 5 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम भरण्याचे मान्य केले आहे, त्यानंतर त्यांच्या बाजूने कोणतीही वचनबद्धता नसेल. TISS जून 2023 पासून टाटा ट्रस्टच्या व्यवस्थापनाखाली नाही. त्यांचा कोणताही प्रतिनिधी बोर्डावर नाही असा विश्वास आहे की त्यांना सामाजिक प्रकल्पांना पाठिंबा द्यावा लागेल असे TOI च्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.