Teacher Murdered on School Campus: लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याने महिला शिक्षकाची शाळेतच हत्या; तामिळनाडू येथील घटना

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तामिळनाडूच्या तंजावरमध्ये एका शिक्षिकेची कॅम्पसमध्ये हत्या करण्यात आली. संशयिताला अटक करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री अनबिल महेश यांनी या घटनेचा निषेध केला असून कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Teacher Murdered on School Campus: लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याने महिला शिक्षकाची शाळेतच हत्या; तामिळनाडू येथील घटना
Knife Attack | (Photo credit: archived, edited, representative image)

Violence Against Women At School Campus: विवाहास नकार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने 26 वर्षीय महिला शिक्षकाची शालेय आवारातच हत्य (Teacher Murder) केली आहे. रमानी असे पीडितेचे नाव आहे. ही घटना तामिळनाडूच्या तंजावर (Thanjavur Incident) जिल्ह्यातील मल्लिपट्टनम सरकारी शाळेच्या परिसरात घडली. मदन नावाच्या एका 30 वर्षीय तरुणाने तिला विवाहासाठी मागणी घातली होती. मात्र, त्याचा प्रस्ताव तिने फेटाळून लावला होता. अखेर त्याने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी मदन यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

शाळेच्या आवारातच पीडितेवर धारधार शस्त्राने वार

पोलिसांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले की, मदन नावाच्या तरुणाने केवळ व्यक्तीगत कारणावरुन तिच्यावह हल्ला केला. मदन आणि त्याच्या कुटुंबाने रमानी आणि तिच्या कुटुंबासोबत विवाहासाठी प्रस्ताव ठेवला होता. मात्र, काही कारणांमुळे चर्चा पुढे होऊ शकली नाही. हा प्रस्ताव प्रलंबितच राहिला. रमानी हिच्याकडून विवाहास होकार मिळत नसल्याने मदन नाराज होता. त्यातूनच तो चिडला आणि तो अचानक रमानी अध्यापनाचे काम करत असलेल्यला शाळेत गेला. तिथे त्याने तिच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. हल्ला इतका भयावह होता की, ज्यामुळे रमानी हिच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या. शरिरावरही खोल वार वर्मी लागले. ज्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर उपस्थितांनी तिला दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तीला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. (हेही वाचा, Telangana Road Accident: तेलंगणामध्ये नगरकुर्नूल इथं ट्रॅक्टरला धडकल्यानंतर स्कूल बस उलटली; 5 विद्यार्थी जखमी (Watch Videos))

शिक्षणमंत्रालयाकडून गंभीर दखल

दरम्यान, शाळेच्या आवारातच शिक्षेवर झालेला हल्ला आणि त्यात तिचा झालेला मृत्यू यामुळे जोरदार खळबळ उडाली आहे. तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोय्यामोझी यांनी घटनेची दखल घेतली असून, हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले साक्षीदार आणि या प्रकारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी विशेष तज्ज्ञांना पाचारण करुन एक सत्रही घेण्याची घोषणा केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे की, "तंजावर जिल्ह्यातील मल्लीपट्टनम सरकारी शाळेत काम करणाऱ्या रमानी या शिक्षिकेवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. शिक्षकांवरील हिंसाचार सहन केला जाऊ शकत नाही. हल्लेखोराविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल." मंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत ही प्रितिक्रिया दिली आहे. दरम्यान, त्यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार संशयिताविरुद्ध जलद आणि कठोर कारवाई करेल, असे आश्वासनी दिले आहे. त्यांनी रमानी यांचे कुटुंबीय, सहकारी आणि विद्यार्थ्यांप्रती शोक व्यक्त केला.  (हेही वाचा, Assam Student Stabs Teacher to Death: कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकची हत्या, अल्पवयीन विद्यार्थ्याला अटक, आसाम येथील धक्कादायक प्रकार)

दरम्यान, या भीषण घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळउडाली आहे. शाळेतील मुले आणि त्यांच्या पालकांसह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्येही घबराट पसरली आहे. घडल्या प्रकारातून सावरण्यासाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना मानसिक समुपदेशन दिले जात आहे. या प्रकरणामुळे शाळेच्या आवारातील सुरक्षिततेबाबत आणि महिलांवरील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).