टेलिव्हिजनवरील चॅनल बदलायला सांगितल्याने संतप्त नवऱ्याकडून बायकोला बेदम मारहाण
तमिळनाडू (Tamil Nadu) येथे एका विवाहित दापंत्यात टेलिव्हिजनवरील चॅनल बदलण्यास सांगितल्याने नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तमिळनाडू (Tamil Nadu) येथे एका विवाहित दापंत्यात टेलिव्हिजनवरील चॅनल बदलण्यास सांगितल्याने नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच पीडित महिलेची प्रकृती गंभीर असल्याने नजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, उशा असे पीडित महिलेचे नाव आहे. उशा आणि तिचा नवरा गुरुवारी दोघे एकत्र बसून टिव्ही पाहत होते. त्यावेळी उशा हिने नवरा पाहत असलेल्या चॅनल बदलण्यास सांगितला. तसेच मला टिव्ही वरील दुसरी मालिका बघायची असल्याने तुम्ही हा चॅनल बदलून टाका अशी गळ नवऱ्याकडे घातली. मात्र नवऱ्याने तो पाहत असलेला चॅनल बदलणार नाही असे सांगितले. या कारणावरुन उशा आणि तिच्या नवऱ्याचा वाद विकोपाला गेला की नवऱ्याने तिला शिवीगाळ करत तिचे डोके टेबलवर आपटले.
तसेच एवढे ही पुरे झाल्यानंतर संतापलेल्या नवऱ्याने घरातून चाकू आणनू तिच्यावर हल्ला केला. तरीही उशा नवऱ्याशी भांडतच राहिली. तर उशावर चाकू हल्ला केल्यामुळे तिच्या छातीला, डोक्याला आणि मानेला गंभीर जखमा झाल्या आहेत. तर पीडित उशावर रुग्णालयात उपचार सुरु असून आरोपी नवऱ्याला अटक करण्यात आली आहे.