Taj Mahal Bomb Threat: ताज महाल परिसरात बॉम्ब ठेवल्याची प्राथमिक माहिती, पर्यटकांची धावाधाव
परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, ताज परिसरातील एकूण सुरक्षेबाबत विचार करायचा तर या ठिकाणी बॉम्ब घेऊन जाणे अगदीच अशक्य गोष्ट मानली जाते. कारण या परिसरात जाणाऱ्या पर्यटक आणि प्रत्येक व्यक्तीची अगदीच कसून तपासणी केली जाते. मात्र, सत्य काय ते तपासानंतरच पुढे याणार आहे.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या ताजमहल येथे बॉम्ब (Bomb ) ठेवल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ताजमहल (Taj Mahal) इमारत परिसरात अज्ञातांनी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच गुरुवारी (4 मार्च) एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या. ताजमहल येथून पर्यटकांना बाहेर काढण्यात येत आहे. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी ताजमहालमचे दोन्ही दरवाजे बंद केले आहेत. या परिसरात बॉम्ब ठेवल्याची माहिती एका व्यक्तीने फोनद्वारे दिली.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान पोलिसांना कथीत बॉम्बबाबात माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ताजमहलचे पूर्व आणि पश्चिम दिशेची दोन्ही प्रवेशद्वारे बंद केली आहेत. यासोबतच ताजमहालच्या बाहेर असलेला बाजारही पोलिसांनी बंद केल्याचे समजते आहे. (हेही वाचा, Taj Mahal Reopens: ताजमहाल पर्यटकांसाठी आजपासून पुन्हा खुलं; कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 'ही' नियमावली बंधनकारक)
बॉम्ब शोधक आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, ताज परिसरातील एकूण सुरक्षेबाबत विचार करायचा तर या ठिकाणी बॉम्ब घेऊन जाणे अगदीच अशक्य गोष्ट मानली जाते. कारण या परिसरात जाणाऱ्या पर्यटक आणि प्रत्येक व्यक्तीची अगदीच कसून तपासणी केली जाते. मात्र, सत्य काय ते तपासानंतरच पुढे याणार आहे.