Swiggy IPO : फूड डिलिव्हरी कंपनी स्विगाचा लवकरच येणार आयपीओ; गुंतवणुकीची मोठी संधी, जाणून घ्या सविस्तर

त्या पार्श्वभूमीवर स्विगी देखील लवकरच आयपीओ बाजारात घेऊन येणार आहे.

Photo Credit: Wikimedia Commons

Swiggy IPO: सध्या भारतीय शेअर बाजारात आयपीओंसाठी चांगले दिवस आहेत. शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी अनेक दिग्गज कंपन्या आपले आयपीओ(IPO)घेऊन बाजारात येत आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला मिळालेला प्रतिसाद पाहून अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ घेऊन येण्यासाठी तयारी केली आहे. यात फूड डिलीव्हरी प्लेटफॉर्म स्विगी (Swiggy IPO) या कंपनीनेही आपला आयपीओ घेऊन येण्याचे ठरवले आहे. स्विगी 2 ते 3 दिवसांत आयपीओसंदर्भातील कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सोपवू शकते. हे झोमॅटो(Zomato)साठी मोठे आव्हान ठरू शकते.  (हेही वाचा: Trafiksol ITS Technologies SME IPO: ट्रॅफिक्सोल आयटीएस टेक्नॉलॉजीज एसएमई आयपीओ नोंदणीसाठी खुला; GMP किती? घ्या जाणून)

दरम्यान, या आठवड्यात स्विगीच्या आयपीओ निघण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व सेबीकडून आयपीओला मंजुरी देण्यावर अवलंबून आहे. जेवढ्या लवकर मंजूरी मिळेल. तेवढ्या लवकर आयपीओ निघेल. सेबीने मंजुरी दिल्यानंतर स्विगीचा आयपीओ आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आयपीओंमधील एक असेल अशी शक्यता आहे. साधारण एक अब्ज डॉलर्सचा हा आयपीओ असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आयपीओच्या आकारात भविष्यात बदलही होऊ शकतो.

दरम्यान, स्विगीची स्थापना 2014 साली झाली होती. ही कंपनी साधारण 1.5 लाख रेस्टॉरंट्सशी जोडली गेलेली आहे. या रेस्टॉरंट्सच्या मदतीने स्विगी देशभरात जेवण पोहोचवते. झोमॅटो ही स्वगीची प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी मानली जात आहे. ही कंपनी याआधीच शेअर बाजारावर सूचिबद्ध झालेली आहे. काही दिवसांपूर्वी स्विगीने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इंस्टामार्टचे (Instamart) अधिग्रहण केलेले आहे. तेव्हापासून अॅमोझॉन इंडिया, टाटा ग्रुपची बिगबास्केट या कंपनीकडूनही स्विगीला आव्हान मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्विगीचा आईपीओ  साधारण एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 8,300 कोटींचा असण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर आयपीओ घेऊन येण्यासाठी आता स्विगीकडून प्रयत्न चालू झाले आहेत. त्यामुळे झोमॅटो ला तगडी टक्क मिळू शकते. झोमॅटो हा स्विगीचा प्रमुख प्रतिस्पर्धी ठरेल.