Swiggy Pawlice: स्वीगी पॉलिस, फूड डिलीव्हरी सोबतच हरवलेले पाळीव प्राणीसुद्धा शोधून देणार; वाचा सविस्तर
स्विगी (Swiggy) ही आजवर फूड डिलिव्हरी म्हणजेच अन्नपदार्थ घरपोच पोहोचवणारी कंपनी म्हणून सर्वश्रूत आहे. पण आता अन्न पदार्थ पोहोचविण्याच्या कामासोबतच स्वीगी एक नवा उपक्रम घेऊन येते आहे. ज्याला 'स्विगी पॉलीस' (Swiggy Pawlice) असे नाव देण्यात आले आहे.
स्विगी (Swiggy) ही आजवर फूड डिलिव्हरी म्हणजेच अन्नपदार्थ घरपोच पोहोचवणारी कंपनी म्हणून सर्वश्रूत आहे. पण आता अन्न पदार्थ पोहोचविण्याच्या कामासोबतच स्वीगी एक नवा उपक्रम घेऊन येते आहे. ज्याला 'स्विगी पॉलीस' (Swiggy Pawlice) असे नाव देण्यात आले आहे. स्विगी पॉलीस हे नागरिकांचे हरवलेले पाळीव प्राणी शोधून देण्यास मदत करणार आहे. कंपनीने नुकताच हा उपक्रम लॉन्च केला. ज्याला टाटा ट्रस्टचे महाव्यवस्थापक शंतनू नायडू, हाऊस ऑफ द चेअरमन आणि अनेक पाळीव प्राणी पालकांची उपस्थिती होती. कसे असेल 'स्विगी पॉलीस', कसे करेल कार्य? घ्या जाणून.
'स्विगी पॉलीस' कसे कार्य करते?
पाळीव प्राणी मालक त्यांच्या हरवलेल्या पाळीव प्राण्यांची तक्रार करण्यासाठी Swiggy ॲप वापरू शकतात. हे ॲप वापरून नागरिक आपल्या हरवलेल्या पाळीव प्राण्यांचे फोटो आणि तत्सम माहिती अपलोड करु शकतात. नागरिकांकडून माहिती मिळताच Swiggy चे 3,50,000 पेक्षा जास्त डिलिव्हरी पार्टनर्सचे त्यांचे विशाल नेटवर्क वापरुन डिलिव्हरी मार्गांदरम्यान या पाळीव प्राण्यांचा शोध घेईल. जर एखादा प्राणी आढळून आला तर स्वीगी बॉय हे त्या प्राण्यांशी संपर्क साधणार नाहीत. त्या ऐवजी ते थेट या प्राण्याची माहिती समर्पित स्विगी टीमला देऊन काळजीपूर्वक सूचित करू शकतात. स्विगीची टीम मिळालेली माहिती तातडीने सदर प्राण्याच्या मालकाशी तातडीने संपर्क साधणार आहे. ज्यामुळे हे प्राणी आणि मूळ मालकांची पुन्हा एकदा भेट होणे सहज शक्य होईल. (हेही वाचा, Tips To Take Care of Pets In Summer: पाळीव प्राण्यांची उन्हाळ्यात घ्या अशी काळजी, जाणून घ्या टीप्स)
Paw-ternity' Leave
'Swiggy Pawlice' वैशिष्ट्याव्यतिरिक्त, Swiggy ने राष्ट्रीय पाळीव प्राणी दिनानिमित्त "Paw-ternity' Leave" देखील सादर केली आहे. हे धोरण पाळीव प्राणी दत्तक रजा आणि पाळीव प्राण्यांच्या काळजीसाठी समर्थन यांसारखे फायदे देते. पाळीव प्राण्यांच्या कल्याणासाठी कंपनीची वचनबद्धता अधोरेखित करते. स्विगीचे सीईओ रोहित कपूर यांनी या वैशिष्ट्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, पाळीव प्राण्यांच्या पालकांना त्यांचे प्रिय साथीदार हरवल्यावर त्यांना होणारा त्रास मोठा असतो. हा त्रास कमी करण्यासाठीच आम्ही हे फीचर आणत असल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा, Swiggy Delivery Boy Steals Customer's Shoes: स्विगी डिलिव्हरी बॉयने पार्सल दिल्यानंतर चोरले ग्राहकाचे Nike चे बूट, व्हिडिओ व्हायरल (Watch))
कपूर यांनी पुढे सांगितले की, आपण स्वतः एक पाळीव प्राणी पालक आहे. त्यामुळे पाळीव प्राणी बेपत्ता झाल्यावर त्याच्या पालकांना काय त्रास होतो याबाबत आपल्याला पूर्ण कल्पना आहे. या प्राणी पालकांची चिंता आणि दु:ख मी स्वतःच समजतो. मी प्रामाणिकपणे आशा करतो की, पाळीव प्राणी हरविल्याची घटना घडली तर स्विगी पॉलीस त्यांची मदत करतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)