भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर 31 डिसेंबर पर्यंत उड्डाणावर निर्बंध कायम

कोविड 19 वायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये DGCA ने प्रवासी वाहतूकीवरील निर्बंध 31 डिसेंबर पर्यंत वाढवले आहेत.

Flights (Representational Image/ Photo Credit: PTI)

कोविड 19 वायरस (COVID 19 Virus)संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये DGCA ने प्रवासी वाहतूकीवरील निर्बंध 31 डिसेंबर पर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात येणारी प्रवासी सेवा अजूनही पूर्ववत करत नसल्याची माहिती आज (26 नोव्हेंबर) दिवशी देण्यात आली आहे. दरम्यान मार्च 2020 पासून देशामध्ये प्रवासी सेवा खंडीत ठेवण्यात आली आहे. दरम्यान काही ठराविक मार्गावर एअर बबलच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरू आहे ती त्याप्रमाणेच सुरू राहणार आहे. तसेच काही ठिकाणी वंदे भारतच्या निमित्ताने ठराविक कालावधीमध्ये विमानसेवा एअर इंडिया कडून सुरू ठेवण्यात आली आहे. Coronavirus in Maharashtra: कोविड-19 निगेटीव्ह अहवाल राज्यात येणाऱ्या विमानातील क्रु मेंबर्ससाठी बंधनकारक नाही

दरम्यान DGCA ने आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवेवर निर्बंध घातले असले तरीही त्याचा फटका कार्गो सेवा व अन्य परवानगी असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानसेवेला बसणार नाही. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडीत झालेली असली तरीही 25 मे 2020 पासून देशांर्गत विमानसेवा मात्र पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच आता परराष्ट्रमंत्रालयाने प्रवासी, मेडिकल आणि ई व्हिसा वगळता इतर व्हिसाच्या सेवा मात्र पूर्ववत केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची ये-जा सुरू आहे.

ANI Tweet

भारतामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 92 लाखांच्या पार गेला आहे. दरम्यान आज आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यामध्ये 44 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर 524 जणांचा मृत्यू झाला आहे.