Surgical Strike 2: पाकिस्तानात वायुसेनेने केलेल्या हल्ल्याची ठिकाणे Google Map वरुन पाहा

यामध्ये जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed) या दहशतवाद्यांच्या संघटनेच्या तळावर हल्ला करण्यात आला.

Surgical Strike 2: पाकिस्तानात वायुसेनेने केलेल्या हल्ल्याची ठिकाणे Google Map वरुन पाहा (Photo Credits-Google Map)

Surgical Strike 2: पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्याचा मंगळवारी वायुसेनेने पाकिस्तानचा (Pakistan) बदला घेतला आहे.यामध्ये जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed) या दहशतवाद्यांच्या संघटनेच्या तळावर हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात 200 दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच हल्ल्यात 12 मिराज 2000 लढाऊ विमानांचा उपयोग केला गेला. मंगळवारी (26 फेब्रुवारी) विदेश मंत्रालयाने पत्रकार परिषदेत या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. मात्र पाकिस्तानकडून आमच्या येथे मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

गुगल मॅप(Google Map) वर पाहा भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या या भागात हल्ले केले आहेत.

यापूर्वी पाठणकोठ येथे सुद्धा जैश संघटनेकडून हल्ला करण्यात आला होता. परंतु पाकिस्तान या संघटनांचे आपल्या देशात स्थान नसल्याचे सांगत आला आहे. तसेच भारताकडून जैशच्या हल्ल्याविरुद्ध पुरावे सादर करुनही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे विजय गोखले यांनी म्हटले आहे. (हेही वाचा-होय, भारतीय लष्कराने कारवाई केली, दहशतवाद्यांचा सर्वात मोठा तळ उदद्ध्वस्त केला: भारतीय परराष्ट्र सचिव)

पाकिस्तानच्या या मुजोरीपणाचे उत्तर देण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आले. तर बालकोट येथे वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात जैशचा कमांडरसह अन्य दहशतवादी मारले गेले आहेत.