Surgical Strike 2: लोहा लोहे को काटता है-पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर नवज्योत सिद्धू यांची प्रतिक्रिया
मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास भारतीय वायुसेनाने पाकिस्तानवर (Pakistan) केलेल्या मोठ्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
Surgical Strike 2: मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास भारतीय वायुसेनाने पाकिस्तानवर (Pakistan) केलेल्या मोठ्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) पासून ते भाजप नेत्यांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले जात आहेत.
तर काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) जे सातत्याने पाकिस्तानच्या मुद्द्यावर चर्चेत राहिले आहेत त्यांनीही भारतीय वायुसेनेचे भरभरुन कौतुक केले आहे. याबाबत सिद्धू यांनी ट्वीटच्या माध्यमातून असे लिहिले आहे की, लोहा लोहे को काटता है अशा शब्दात वायुसेनेच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.(हेही वाचा-जम्मू काश्मीर: फुटीरवादी नेत्यांनी जाहीर केला बंद; श्रीनगरमध्ये 14 वर्षांनंतर BSF च्या तुकड्या तैनात)
दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी असे म्हटले होते की, काही लोकांच्या वागण्यामुळे संपूर्ण पाकिस्तानला आरोपी ठरवू नये. अशा या वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धू यांच्यावर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच विरोधी पक्षाकडून ही त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात होता.