Surgical Strike 2: भारतीय सैन्याकडून पाकिस्तान लष्कराच्या 5 चौक्या उद्ध्वस्त

पाकिस्तानला आता प्रतिउत्तर देत भारतीय जवानांनी त्यांच्या 5 लष्करी चौक्या उद्ध्वस्त करुन लावल्या आहेत.

भारतीय सेना (Photo Credit: PTI)

Surgical Strike 2: भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) मंगळवारी (26 फेब्रुवारी) रोजी पाकव्याप्त काश्मिरवर केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची तणतणली आहे. त्यानंतर पाकिस्तानने (Pakistan)नियंत्रण सीमारेषेवर (LOC) काल संध्याकाळपासून गोळीबार सुरु केला आहे. मात्र पाकिस्तानला आता प्रतिउत्तर देत भारतीय जवानांनी त्यांच्या 5 लष्करी चौक्या उद्ध्वस्त करुन लावल्या आहेत.

भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून सीजफायरिंग काल संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास सुरु करण्यात आली. मात्र जवानांनी पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला चोख प्रतिउत्तर दिले आहे. तसेच पाकिस्तानकडून भारतीय क्षेत्रातील जवळजवळ 12-15 ठिकाणांवर हल्ला करण्याचे ठरविले होते. मात्र जवानांनी त्यांच्यावर उलट हल्ला करत त्यांच्या लष्कराच्या 5 चौक्या उडवून लावल्या आहेत.(हेही वाचा-Surgical Strike 2 नंतर जम्मू-कश्मीर येथील शोपियाँ परिसरात चकमक सुरु; 'जैश ए मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान)

यामुळे पाकिस्तान सैनिक मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. तर आज भारतीय सेनेने दहशतवाद्यांना घेरले असून त्यातील दोघांना कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आले आहे. दोन्ही बाजूने अंदाधूंद गोळीबार सुरु आहे.