सुरत: बायकोच्या घरातील मंडळींनी रिक्षा खरेदी करण्यासाठी पैसै न दिल्याने नवऱ्याने दिला तिहेरी तलाक

तरीही गुजरात (Gujrat) मधील सुरत येथे विवाह दांत्पत्यात तिहेरी तलाक झाला असल्याची घटना समोर आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

गुरुवारी (25 जुलै) तिहेरी तलाक (Triple Talaq) विधेयकाला लोकसभेत 303 मतं मिळाल्याने मंजूरी देण्यात आली आहे. तरीही गुजरात (Gujrat) मधील सुरत  येथे विवाह दांत्पत्यात तिहेरी तलाक झाला असल्याची घटना समोर आली आहे. नवऱ्याने बायकोला तिच्या माहेरहून रिक्षा घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी गळ घातली. मात्र बायकोच्या घरातील मंडळींनी त्यासाठी पैसे न दिल्याने नवऱ्याने संताप व्यक्त करत तिला तलाक दिला आहे.

बायकोने घरातील मंडळींकडून 40 हजार रुपये घेऊन मला रिक्षा घेण्यासाठी ते पैसे द्यावे अशी मागणी नवऱ्याने केली होती. परंतु बायकोने या गोष्टीसाठी नकार दिल्यावर नवऱ्याने तिला तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार घडला आहे. तर पीडित महिलेने नवऱ्याला शिक्षा मिळावी म्हणून पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.(Triple Talaq Bill: 303 मतांनी 'तीन तलाक विधेयक' लोकसभेत अखेर मंजूर)

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेत तिहेरी तलाकबद्दल विधेयक पास करण्यात आले. त्यानुसार तलाक देणाऱ्या नवऱ्याला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर तिहेरी तलाक विधेयक प्रथम 27 डिसेंबर 2018 मध्ये मांडण्यात आले होते. परंतु तेव्हा राज्यसभेत ते मंजूर झाले नाही.