Women's Reservation Bill: खासादर सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, पूनम महाजन यांच्या महिला आरक्षण विधेयकाबद्दल भावना काय? घ्या जाणून

महिला विधेयकावर सर्वपक्षीय महिला खासदारांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (UBT) प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस खासदार रजनी पाटील, भाजप खासदार पूनम महाजन यांच्यासह इतरही राजकीय पक्षांच्या महिला खासदारांच्या प्रतिक्रिया आपण येथे पाहू शकता.

Supriya Sule, Priyanka Chaturvedi, Rajni Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

Supriya Sule on Women's Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झाले. त्यामुळे आता या विधेयकावर राजभवनातून स्वाक्षरीची मोहोर उमटली की त्याचे रुपांतर कायद्यात होईल. अर्थात आरक्षण केव्हापासून लागू होईल याबाबत अद्यापही अनभिज्ञताच आहे. तरीही पाठिमागील अनेक वर्षांच्या या विधेयकाचा संघर्ष संपुष्टात आला ही जमेची बाब. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमत दाखवल्याने हे विधेयक बहुमताने संमत झाले. या विधेयकावर सर्वपक्षीय महिला खासदारांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (UBT) प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), काँग्रेस खासदार रजनी पाटील (Rajni Patil), भाजप खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्यासह इतरही राजकीय पक्षांच्या महिला खासदारांच्या प्रतिक्रिया आपण येथे पाहू शकता.

महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा आहे. मात्र, तरीही हे विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक आहे. कारण अद्यापही अद्यापही जनगणना झाली नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तरी या विधेयकानुसार आरक्षण मिळण्याची शक्यता कमी आहे. परिणामी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सन 2029 उजाडावे लागेल.

काँग्रेस महिला खासदारांची संख्या किती? पूनम महाजन याचा सवाल

महिला आरक्षण विधेयकावर बोलताना पूनम महाजन यांनी थेट काँग्रेसवर हल्ला केला आहे. काँग्रेस याला जुमला म्हणूदेत किंवा आणखी काही... पण ते महिलांना तिकीट देत नाहीत. भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे ज्याने भारताला पूर्णवेळ महिला अर्थमंत्री दिला. काँग्रेसमध्ये किती महिला खासदार आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ट्विट

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महिला आरक्षण लागू करा- रजनी पाटील

महिला विधेयक संसदेत मंजूर झाल्याबद्दल आम्ही (काँग्रेस) खूप आनंदी आहोत. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर हे विधेयक मंजूर झाले. पण, आमची मागणी अशी आहे की, ओबीसी आरक्षणासह (OBC Reservations) येत्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महिला आरक्षण लागू करण्यात यावे. याशिवाय जातनिहाय जणगणना करावी, अशीही आमची मागणी आहे.

ट्विट

भावनिक आणि आनंदाचा क्षण- प्रियंका चतुर्वेदी

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सर्वानुमते मंजूर होणे हा भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे. ते लगेच सुरू होईल अशी आशा आहे. संसदेतील या ऐतिहासिक क्षणाचा मी एक भाग आहे याचा मला विशेष आनंद होतो, अशा भावना शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

व्हिडिओ

मोदी है तो मुमकिन है- स्मृती इराणी

'आम्ही नेहमीच म्हणत आलो आहे, मोदी है तो मुमकीन है.., आज त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे', असे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. त्या संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाबद्दल बोलत होत्या.

ट्विट

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now