Vijay Mallya: न्यायालयाचा अवमान, सुप्रीम कोर्ट उद्योगपती विजय माल्या याला 5 सप्टेंबर रोजी ठोठावणार शिक्षा
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय फरारी उद्योगपती विजय माल्या याला दोषी ठरवलेल्या अवमान प्रकरणात सोमवारी (5 सप्टेंबर) शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.
उद्योगपती विजय माल्या (Vijay Mallya) याला सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) उद्या म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी शिक्षा ठोठावणार आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय फरारी उद्योगपती विजय माल्या याला दोषी ठरवलेल्या अवमान प्रकरणात सोमवारी (5 सप्टेंबर) शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. माल्या याच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा समावेश असलेल्या 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक कर्ज थकबाकी प्रकरणात तो आरोपी आहे.
सरन्यायाधीश उदय उमेश ललित आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने 10 मार्च रोजी माल्या विरुद्धच्या अवमान खटल्यातील शिक्षेबाबतचा आपला आदेश राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने अवमान कायदा आणि शिक्षेशी संबंधित विविध पैलूंवर ज्येष्ठ वकील आणि अॅमिकस क्युरी जयदीप गुप्ता यांची सुनावणी घेतली आणि मल्ल्याचे वकील अंकुर सैगल यांना शिक्षेच्या मुद्द्यावर लेखी सबमिशन दाखल करण्याची शेवटची संधी दिली. दरम्यान, प्रसिद्ध वकील अंकुर सैगल यांनी, न्यायालयाने लेखी देण्याबाबतची संधी दिली असतानाही ही संधी घेण्यास असमर्थता व्यक्त केली. (हेही वाचा,Vijay Mallya च्या अडचणीत वाढ; सर्वोच्च न्यायालय उद्या अवमान प्रकरणी शिक्षा सुनावण्याची शक्यता )
अंकुर सैगल यांनी सांगितले की यूकेमध्ये असलेल्या त्याच्या क्लायंटकडून (माल्या) कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे बाजू मांडण्यासाठी आपण असमर्थ आहोत. त्यामुळे अवमान प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद करू शकणार नाही. कोर्टाने म्हटले की, आम्हाला सांगण्यात आले आहे की युनायटेड किंगडम (यूके) मध्ये काही कार्यवाही सुरू आहेत. ती मृतावस्थेत असल्यासारखी आहे. किती काळ प्रलंबित राहील याबाबत आम्हाला माहित नाही. तसेच, आम्हाला हेही माहित नाही की त्यांची (प्रकरणांची) संख्या किती आहे. त्यामुळे मुद्दा आमच्या अधिकारक्षेत्राच्या अधिकाराशी संबंधीत आहे. त्यामुळे हे प्रकरण आम्ही असे किती काळ चालू ठेवू शकतो?