Sunil Bharti Mittal Get Honorary knighthood: भारती एंटरप्रायझेसचे चेअरपर्सन सुनील मित्तल यांना King Charles III कडून मानद 'नाइटहूड' पदवी; ठरले पहिले भारतीय
सुनील भारती मित्तल हे टेलिकॉम टायकून म्हणून ओळखले जातात. त्यांची कंपनी एअरटेल देशातील सर्वात मोठ्या मोबाईल फोन ऑपरेटर्सपैकी एक आहे. एअरटेलचे 474 दशलक्ष ग्राहक आहेत. सुनील भारती मित्तल यांना 1988 मध्ये राज्यसभेसाठी नामांकन मिळाले होते.
Sunil Bharti Mittal Get Honorary knighthood: भारती एंटरप्रायझेसचे (Bharti Enterprises) संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांना बुधवारी युनायटेड किंगडममध्ये, ब्रिटिश साम्राज्याचा सर्वोच्च पुरस्कार 'नाइटहूड' (knighthood) या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. भारत-ब्रिटन व्यापारी संबंध पुढे नेण्यासाठी किंग चार्ल्स तिसरा यांनी सुनील भारती मित्तल यांना हा सन्मान दिला. यासह सुनील मित्तल हे 'नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर' (KBE) हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत.
केबीइ हा ब्रिटिश सार्वभौम द्वारे प्रदान केलेल्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. या अंतर्गत परदेशी नागरिकांना मानद पदव्या दिल्या जातात. भारतीय साहित्यातील एकमेव नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ नाथ टागोर यांना ब्रिटिश सरकारने 1915 मध्ये नाइटहूड किंवा सर ही पदवी दिली होती. पण टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा तीव्र निषेध करून आपली पदवी परत केली.
सुनील भारती मित्तल हे टेलिकॉम टायकून म्हणून ओळखले जातात. त्यांची कंपनी एअरटेल देशातील सर्वात मोठ्या मोबाईल फोन ऑपरेटर्सपैकी एक आहे. एअरटेलचे 474 दशलक्ष ग्राहक आहेत. सुनील भारती मित्तल यांना 1988 मध्ये राज्यसभेसाठी नामांकन मिळाले होते. नाइटहूड ही मानद पदवी मिळाल्यानंतर सुनील भारती मित्तल म्हणाले, 'किंग चार्ल्सकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल मी खूप आभारी आहे. ब्रिटन आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. हे संबंध आता वाढीव सहकार्याच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत. आमच्या दोन महान देशांमधील आर्थिक आणि द्विपक्षीय व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी मी वचनबद्ध आहे.' (हेही वाचा: Vantara Project: अनंत अंबानीने सुरु केला 3 हजार एकरवर पसरलेला 'वनतारा' प्रकल्प; हत्तींपासून वाघापर्यंत 2000 प्राण्यांना मिळणार निवारा, जाणून घ्या सविस्तर)
मित्तल पुढे म्हणाले, "मी ब्रिटन सरकारचा आभारी आहे, ज्यांचे समर्थन आणि व्यवसायांच्या गरजांकडे लक्ष देणे हे देशाला आकर्षक गुंतवणूक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.' सुनील भारती मित्तल यांना 2007 मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मभूषण' प्रदान करण्यात आला. भारती एंटरप्रायझेस हा एक मोठा भारतीय व्यावसायिक समूह आहे जिचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे. श्रीलंका, बांगलादेश, जर्सी, ग्वेर्नसे आणि सेशेल्ससह आफ्रिकेतील बुर्किना फासो, चाड, काँगो ब्राझाव्हिल, काँगो येथे शाखा आहेत. गेल्या वर्षी भारत जी-20 अध्यक्ष असताना, मित्तल यांनी B20 इंडिया ॲक्शन कौन्सिल ऑन आफ्रिकन इकॉनॉमिक इंटिग्रेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ/युनेस्को ब्रॉडबँड आयोगाचे आयुक्त देखील आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)