Sukma Naxal Attack: नक्षलवादी हल्यातील शहीद जवानांसह मृतांची संख्या 22 वर पोहोचली, 'त्या' बेपत्ता 14 जणांचे मृतदेह सापडले

या वेळी 21 जण बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवान आणि इतरांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. या वेळी बेपत्ता असलेल्या 21 पैकी 14 जणांचे मृतदेह सापडले. बेपत्ता असलेल्या उर्वरीतांचा तपास अद्यापही सुरु आहे.

Sukma Naxal Attack | (Photo Credits: ANI)

नक्षलवादी हल्लात (Naxal Attack) शहीद झालेल्या शहीद जवानांची संख्या आता 22 इतकी झाली आहे. छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे नक्षलवाद्यांनी काल (शनिवार, 3 मार्च) सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला (Sukma-Bijapur Naxal Attack) केला. या वेळी झालेल्या चकमकीत सीआरपीएफ (CRPF) चे पाच जवान शहीद झाले, तर अन्य 12 जण जखमी झाले. त्यातील 21 जण बेपत्ता होते. ताज्या माहितीनुसार या बेपत्ता पैकी 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे या हल्लात मृत आणि शहीद झालेल्यांची एकूण संख्या 22 इतकी झाली आहे.

छत्तीसगमधील बिजापूर आणि तररेम जंगलात पोलीस आणि सुरक्षा दल यांच्यासोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. या वेळी 21 जण बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवान आणि इतरांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. या वेळी बेपत्ता असलेल्या 21 पैकी 14 जणांचे मृतदेह सापडले. बेपत्ता असलेल्या उर्वरीतांचा तपास अद्यापही सुरु आहे. (हेही वाचा, Chhattisgarh: बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 15 जवान बेपत्ता, 5 शहीद; तर 30 जण गंभीर जखमी)

बिजापूर, सुकामा आणि कांकेर परिसरात नक्षलवादी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कँप लावत होते. या कँम्पमध्ये जवळपास 200 ते 300 नक्षलवादी सहभागी होत असल्याची माहिती होती. तसेच, हे दहशतवादी बिजापूर परिसरात आयडी प्लांट करण्याबाबत योजना आखत होते. ही योजना छत्तीसगडच्या बिजापूर कँम्पमध्ये बसून कमांडर पातळीवरील नक्षलवादी आखत होते अशी माहिती पुढे येऊ लागली आहे.

दरम्यान, नक्षलवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहीली आहे. देशाच्या गृहमंत्रालयानेही डीजींना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.