Stock Market Today: शेअर बाजारात सौम्य घसरण; मध्यपूर्व तणावामुळे गुंतवणूकदार साशंक
Israel Iran Conflict Impact: भारतीय शेअर बाजारात आज सुरुवातीच्या घसरणीनंतर थोडी सुधारणा झाली. मात्र, मध्यपूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमजोर राहिल्या. तेल, बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रात घसरण, तर मिडिया आणि रिअल्टी क्षेत्रात थोडी सुधारणा पाहायला मिळाली.
BSE NSE Market Update: भारतीय शेअर बाजारात (Stock Market Today) शुक्रवारी (13 जून) व्यवहाराच्या सुरुवातीला तीव्र घसरण झाली होती. मात्र, दिवसभरात काहीशी सुधारणा झाली आणि व्यवहार समाप्तीच्या वेळी प्रमुख निर्देशांक सौम्य घसरणीसह बंद झाले. हे सर्व मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडले, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. दिवसअखेरीस, बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 81,167.35 वर बंद (Sensex Nifty Fall June 2025) झाला, जो 524.62 अंकांनी म्हणजेच 0.64% नी घसरला होता. त्याच वेळी, निफ्टी फिप्टी (Nifty 50) मध्ये 152.20 अंकांची म्हणजेच 0.61% ची घसरण झाली आणि तो 24,739.60 वर बंद झाला. बीएसई मीडकॅप (BSE Midcap) आणि स्मॉलकॅप (Smallcap) निर्देशांकांमध्येही घसरण नोंदवली गेली.
नॅशनल स्टक एक्स्चेंज (NSE) वरील बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. मिडिया आणि रिअल्टी क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रात घसरण दिसून आली. FMCG, सरकारी बँका, तेल व वायू, वीज आणि टेलिकॉम क्षेत्रांत 0.5% ते 1% पर्यंत घसरण झाली.
मध्यपूर्वेतील तणावामुळे बाजाराला झळ
इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढती लष्करी तणावपूर्ण परिस्थिती ही गुंतवणूकदारांच्या चिंतेचे मुख्य कारण बनली आहे. यामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर धोका निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर होतो.
अनंद राठी ग्लोबल फायनान्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन व्यास यांनी सांगितले की, 'भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजांपैकी 80% पेक्षा जास्त आयात करतो. इराणकडे जगातील 9% तेल साठा आहे. जर तणाव लांबला, तर BPCL, HPCL, IOC यांसारख्या तेल कंपन्या, Asian Paints, Berger Paints या पेंट कंपन्या, तसेच ऑटोमोबाईल आणि सिमेंट उद्योगांवर परिणाम होऊ शकतो.' ते पुढे म्हणाले की, USD 82 ते 85 प्रति बॅरलच्या वर कच्च्या तेलाचे दर गेले, तर 3 ते 6 महिन्यांच्या कालावधीत या क्षेत्रांवर मागणी घट किंवा नफा मार्जिन कमी होण्याचा धोका संभवतो.
तेल दरवाढ आणि महागाईची भीती
Brent Crude तेलाचे दर USD 75 प्रति बॅरलच्या वर गेले आहेत, ज्यामुळे महागाई आणि व्यवसायांच्या इनपुट खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
Ventura रिसर्चचे प्रमुख विनीत बोळिंजकर यांनी सांगितले की, या वाढत्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोने आणि सरकारी बाँड्सकडे वळवली, ज्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा कल दिसून आला.
Hedged.in चे उपाध्यक्ष डॉ. प्रविण द्वारकानाथ यांनी सांगितले की, 'Nifty निर्देशांक सध्या 24,500 ते 25,200 या श्रेणीत मर्यादित व्यवहार करत राहील, जोपर्यंत या पातळ्यांपैकी एक मोडत नाही.'
जागतिक अस्थिरता आणि एफआयआयचे बाहेर पडणे
चे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, 'जागतिक अस्थिर संकेत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) विक्रीचा दबाव यामुळे भारतीय निर्देशांकांवर दबाव आहे.'
त्यांनी असेही नमूद केले की, 'भारताचा मे महिन्यासाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) RBI च्या आरामदायक पातळीखाली आहे, जे एक सकारात्मक संकेत आहे. मात्र, जागतिक अनिश्चिततेने त्याचे महत्त्व कमी केले आहे.'
पुढील दिशा काय?
सध्याच्या जागतिक तणावग्रस्त परिस्थितीत आणि वाढत्या तेल दराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार संयम राखण्याची शक्यता आहे. बाजार सध्या विशिष्ट दिशेविना व्यवहार करत असून, स्पष्ट ब्रेकआउट होईपर्यंत मर्यादित चढउतार कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

