Stock Market Nifty 50, Sensex Today: भारतीय शेअर बाजारात संमिश्र स्थिती; जाणून घ्या वधारलले आणि घसरण झालेले समभाग

मंगळवारी (8 ऑक्टोबर) सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा तेव्हापासून बीएसई सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty 50) अनुक्रमे घसरुन लाल रंगात रंगू लागला आहे.

Indian Stock Market | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market Today Updates) मंगळवारी (8 ऑक्टोबर) सकाळी काहीसा संमिश्र स्वरुपात सुरु झाला. बॉम्बे स्टॉक एक्चेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्चेंजचा निफ्टी काहीसे सपाट पाहायला मिळाले. दोन्हीमध्ये फारसा चढ किंवा उतार दिसत नव्हता. बाजार सुरु झाला तेव्हा सकाळी 9:16 दरम्यान, BSE सेन्सेक्स 81,000 च्या वर होता, तर निफ्टी50 24,750 च्या जवळ होता. बीएसई सेन्सेक्स 2 अंकांनी किंवा 0.0021% वाढून 81,051.67 वर व्यापार करत होता. निफ्टी50 8 अंकांनी किंवा 0.031% घसरून 24,788.15 वर पाहायला मिळत होता.

भारतीय शेअर बाजारात पाठिमागील पाच ते सहा दिवसांपासून सातत्याने थोड्या फार प्रमाणातील वधारासह सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजार आणि कच्चा तेल बाजारात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत असल्याचे पडसाद स्थानिक शेअर बाजारात पाहायला मिळत असल्याचे अभ्यासक सांगत आहेत.

भारतीय शेअर बाजारात आज सकाळी 9.45 पर्यंत जो कल पाहायला मिळाला. त्यानुसार समभागांची स्थिती खालील प्रमाणे:

वधारलेले समभाग

बाजारात आज महेंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्रासिमेंट, टायटन, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्यासोबतच एक्सीस बँक, एसबीआय, अल्ट्रासिमेंट, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, सन फार्मा, एशीएन पेंट्स, इंडसंड बँक, भारती एअरटेल, रिलायन्स, बजाज फायनान्स, यां कंपन्यांचे समभाग वधारताना दिसले.

घसरलेले समभाग

तर, नेस्ले, आयटीसी, बजाज फायनान्स, मारुती, एटीपीसी, टेकमहिंद्रा, टीसीएस, इन्फोसीस, पॉवरग्रीड, एचसीएल टेक्नोलॉजी, टाटामोटर्स जेडब्लूएस स्टील, टाटा स्टील.

दरम्यान, शेअर बाजारावर स्थानिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. ज्यामुळे गुंतवणुकदारांना सतत सतर्क राहवे लागते. बाजाराचे अभ्यासक आणि विश्लेषक सांगत आहेत की, पाठिमागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवरुन सातत्याने युद्धाच्या बातम्या येत आहेत. खास करुन रशिया युक्रेन संघर्ष, इस्त्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यात गाझा पट्टीवर सुरु असलेला संघर्ष त्यात इरान आणि लेबेनॉन यांचा झालेला समावेश पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्याचे पडसाद स्थानिक शेअर बाजारावर पत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांनी थोड्याफार फायद्याने आनंदी न होता सातत्याने घसरण होत असलेल्या बाजाराकडेही लक्ष ठेवायला हवे. अन्यथा मोठ्या नुकसानीस सामोजेर जावे लागू शकते, असे अभ्यासक सांगतात. दरम्यान, कोविड महामारीपासून भारतीय शेअर बाजार मात्र तेजी अनुभवतो आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, ते किती काळा राहू शकेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.



संबंधित बातम्या