SBI च्या ग्राहकांना 1 ऑगस्ट पासून मिळणार 'या' सुविधा मोफत

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसबीआयने (SBI) आता त्यांच्या ग्राहकांसाठी पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कार्यप्रणातील IMPS सेवा 1 ऑगस्टपासून पूर्णपणे मोफत करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

SBI च्या ग्राहकांना 1 ऑगस्ट पासून मिळणार 'या' सुविधा मोफत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसबीआयने (SBI) आता त्यांच्या ग्राहकांसाठी पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कार्यप्रणातील IMPS सेवा 1 ऑगस्टपासून पूर्णपणे मोफत करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचसोबत लवकरच NEFT आणि RTGS साठी आकारण्यात येणारे शुल्क सुद्धा रद्द करण्यात येणार आहेत.

यापूर्वी आरबीआयकडून या सुविधांसाठी सुट देण्यात आली होती. त्यानंतर आता एसबीआय सुद्धा आपल्या ग्राहकांना या सुविधा मोफत मिळणार आहेत. तर बँकेकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एनईएफटीस आरटीजीएस आणि आयएमपीएस या सुविधा दिल्या जातात. तर आत आयएमपीएस सुविधा मोफत करणार असल्याचा निर्णय स्टेट बँकने घेतला आहे.

(इन्कम टॅक्स रिटर्न 31 जुलै पूर्वी न भरल्यास 'असा' आकारला जाईल दंड)

आयएमपीएस म्हणजे मोबाईल अॅपच्या माध्यमातून तात्काळ पैसे ट्रान्सफर करता येतात. या सुविधेचा वापर करुन काही मिनिटांतच पैसे दुसऱ्यांना पाठवता येतात. तर या सुविधेसाठी शुल्क घेतले जात होते. मात्र आता ही सुविधा वापरुन ग्राहक दिवसातून कधीही पैसे ट्रान्सफर करु शकता. या सुविधेचा उपयोग करत जास्तीत जास्त 2 लाख रुपये ट्रान्सफर करु शकता येणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2019 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).