Sri Lanka Playing 11 Against England 1st Test: इंग्लंडसाठी पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनची घोषणा, मिलन रथनायके मँचेस्टरमध्ये करणार पदार्पण
उद्यापासून म्हणजेच 21 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
उद्यापासून म्हणजेच 21 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात कसोटी मालिका (Test Series) खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना मँचेस्टरच्या (Manchester) अमिराती ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर (Emirates Old Trafford Stadium) खेळवला जाणार आहे. असून श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा (Dhananjay De Silva) करणार आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर आहे. पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेने आपले प्लेइंग इलेव्हनही जाहीर केले आहे.
पाहा पोस्ट -
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, मिलन रथनायके.