Sovereign Gold Bond Scheme चा दुसरा टप्पा आजपासून सुरु; 'हे' आहेत ऑनलाईन सोने खरेदीचे दर
नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi) व आरबीआयच्या (RBI) संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या सॉव्हरेन गोल्ड बाँड योजेनचा (Sovereign Gold Bond Scheme) दुसरा टप्पा आज 11 मे पासून सुरु झाला आहे
नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi) व आरबीआयच्या (RBI) संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या सॉव्हरेन गोल्ड बाँड योजेनचा (Sovereign Gold Bond Scheme) दुसरा टप्पा आज 11 मे पासून सुरु झाला आहे. 11 मे ते 15 मे दरम्यान हा टप्पा पार पडणार आहे. अर्थचक्राला सुरु करण्यासाठी ऑनलाईन सोने खरेदीचा हा पर्याय 20 एप्रिल पासून सुरु करण्यात आला आहे. या मार्गे सोने खरेदी ही अप्रत्यक्ष रित्या म्हणजेच ऑनलाईन बॉण्ड च्या स्वरूपात करता येणार आहे, आजचा सोने खरेदीचा भाव हा प्रति ग्राम 4,590 रुपये ठरवण्यात आला आहे. त्यानुसार प्रति टोला सोन्याचे दर हे 45, 900 रुपये असणार आहेत. गोल्ड सॉव्हरेन बाँड्सचे सब्सक्रिप्शन घेता येणार आहे. या बाँडचा हप्ता 19 मे रोजी जारी करण्यात येईल
गोल्ड सॉव्हरेन बाँड्स हे ऑनलाईन पद्धतीने खरेदी करायचे झाल्यास प्रति ग्रॅम सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. ऑनलाइन सोने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 4,540 रुपयांनी सोने खरेदी करता येईल. या योजनेच्या अंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता.
सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड स्कीमचे काही डिटेल्स
-सोने गुंतवणुकीमुळे तुम्हाला करात सवलत तसेच गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.
-आठ वर्षापर्यंत ही गुंतवणूक असेल तसेच पाच वर्ष पूर्ण झाल्यावर ग्राहक बॉण्ड मधून बाहेर पडू शकतील.
-Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होईल.
- यासाठी ऑनलाईन अर्ज आणि खरेदीचे पेमेंट करण्याची मुभा आहे ज्यानुसार 50 रुपयांची सूट दिली जाणार आहे.
दरम्यान, आरबीआयच्या माहितीनुसार या योजनेला एप्रिलमध्ये 17.73 लाख यूनिटसाठी जवळपास 822 कोटी सब्सक्रिप्शन मिळाले. ऑक्टोबर 2016 नंतरचे हे सर्वात मोठ्या प्रमाणात मिळालेले सब्सक्रिप्शन आहे. कोरोना व्हायरस लॉक डाऊन काळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे या योजनेला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळत आहे.