Sorry Mom, I Kill You: आईची हत्या केल्यानंतर मुलाने सोशल मिडीयावर फोटो ठेवत मागितली माफी; राजकोटमध्ये खळबळ
त्यांचा मुलगा नीलेशने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली असून, सुरुवातीला त्याने आईवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
गुजरातमधील राजकोटमध्ये एका 21 वर्षीय तरुणाला त्याच्या आईची हत्या केल्याप्रकरणी आणि नंतर तिच्या मृतदेहासोबत इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका स्थानिक रहिवाशाने पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि राजकोटमधील युनिव्हर्सिटी रोडवरील भगतसिंहजी गार्डनमध्ये त्याच्या आईच्या मृतदेहाशेजारी बसलेला आरोपी नीलेश गोसाई याला पाहण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा ही घटना उघडकीस आली. आईची हत्या केल्यानंतर मुलाने इन्स्टाग्रामवर आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि पोस्टमध्ये लिहिलं की, ‘माफ कर आई, मी तुला मारलं, तुझी आठवण येते, ओम शांती.’ दरम्यान या घटनेनंतर गुजरातमधील राजकोटमध्ये खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - Bengaluru Shocker: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या, दोघांनी केला होता प्रेमविवाह, रोज होत असे भांडण)
ज्योतिबेन गोसाई असे पीडित महिलेचे नाव असून त्या 48 वर्षांच्या होत्या. त्यांचा मुलगा नीलेशने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली असून, सुरुवातीला त्याने आईवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. ज्योतिबेनने चाकू हिसकावून घेण्यात यश मिळविले तेव्हा नीलेशने त्यांचा गळा आवळून खून केला. गुन्हा केल्यानंतर, त्याने त्याच्या आईचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला, "सॉरी आई मी तुला मारतो, मला तुझी आठवण येते, ओम शांती." प्राथमिक तपासाअंती असे समोर आले की, ज्योतिबेन या अनेक वर्षांपासून गंभीर मानसिक आजाराने त्रस्त होत्या, त्यामुळे त्यांच्या मुलासोबत वारंवार वाद आणि हाणामारी होत असे. घटनेच्या दिवशी नीलेश आणि ज्योतीबेन यांच्यात झालेल्या जोरदार वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचे सांगितले. . यासंदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे.
राजकोटमधील युनिव्हर्सिटी रोडवरील भगतसिंह गार्डनर परिसरात 48 वर्षांच्या ज्योतिबेन गोसाई आणि त्यांचा मुलगा निलेश हे राहत होते. ज्योतिबेन यांना मानसिक आजार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे ज्योतिबेन या मुलाबरोबर नेहमी भांडण करत असत. याच दररोजच्या भांडणाला कंटाळून 21 वर्षांच्या निलेशने हे पाऊल उचलले.