Sonia Gandhi: सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल
त्यांना ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याचे समजते. त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात (Sir Gangaram Hospital) दाखल करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या (Congress ) माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याचे समजते. त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात (Sir Gangaram Hospital) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, काही किरकोळ बाबी वगळता त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चिंता करण्याचे कारण नाही. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे रुग्णालयातील सूत्रांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. त्याही वेळी त्यांना दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
ट्विट
पाठिमागील काही दिवसांपासून सोनिया गांधी पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सक्रीय झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांचे सक्रीय होने काँग्रेस पक्षासाठी अधिक महत्त्वाचे आहे. खास करुन विरोधकांनी स्थापन केलेल्या I-N-D-I-A आघाडी स्थापन झाल्यावर त्या अधिक सक्रीय झाल्या आहेत. मुंबई येथे पार पडलेल्या या आघाडीच्या बैठकीला त्या नुकत्याच पूर्णवेळ उपस्थित होत्या. त्या आधी झालेल्या बंगळुरु येथील बैठकीसाठीही त्या उपस्थित होत्या.