Sonam Wangchuk Detained: सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्लीच्या लडाख भवनाबाहेर निदर्शने केल्याबद्दल घेण्यात आले ताब्यात
दिल्लीच्या लडाख भवनाबाहेर निदर्शने केल्याबद्दल हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि इतर 20 निदर्शकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्लीच्या लडाख भवनाबाहेर निदर्शने केल्याबद्दल हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि इतर 20 निदर्शकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वांगचुक यांच्यासोबत उपोषण करणाऱ्या सुमारे 20 ते 25 आंदोलकांना ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले, असे त्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (हेही वाचा - Sonam Wangchuck: सोनम वांगचूक यांनी 21 दिवसांनंतर सोडले उपोषण, लडाखला राज्याचा दर्जा मिळवण्यासाठीचा लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार )
काही आंदोलकांनी ते आंदोलन करत नसून शांततेने बसले असल्याचा युक्तिवाद केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आंदोलकांना लडाख भवनाबाहेर बसण्याची परवानगी नाही. "त्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज विचाराधीन आहे. त्यांना इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी नाही. आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे, त्यांना लवकरच सोडण्यात येईल," असे ते म्हणाले.
पाहा व्हिडिओ -
संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करण्याची मागणी करत वांगचुक यांनी त्यांच्या समर्थकांसह लेह येथून दिल्लीकडे कूच केले. त्यांना राजधानीच्या सिंघू सीमेवर 30 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि 2 ऑक्टोबरच्या रात्री सोडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख नेत्यांच्या भेटीची मागणी हा गट करत आहे.
राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये ईशान्येकडील आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांतील आदिवासी भागातील प्रशासनाच्या तरतुदींचा समावेश आहे. हे स्वायत्त परिषद स्थापन करते ज्यांना या क्षेत्रांवर स्वतंत्रपणे शासन करण्यासाठी विधायी, न्यायिक, कार्यकारी आणि आर्थिक अधिकार आहेत.