Social Media Influencer Suicide: मध्य प्रदेशात ट्रोलिंगला कंटाळून एन्फ्लूएंसरने राहत्या घरी केली आत्महत्या

मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये सोशल मीडियावरील व्हिडीओवर येणाऱ्या कमेंटला कंटाळून एका 16 वर्षीय सोशल मीडिया एन्फ्लूएंसरने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये सोशल मीडियावरील व्हिडीओवर येणाऱ्या कमेंटला कंटाळून एका 16 वर्षीय सोशल मीडिया एन्फ्लूएंसरने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. ही घटना 21 नोव्हेंबरला घडली आहे. त्याने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. नागझिरी पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करत आहे. (हेही वाचा - Fatehabad Dog Attack: पाळीव कुत्र्याने दीड वर्षाच्या मुलीला ओरबाडले, मालकावर गुन्हा दाखल)

सोशल मीडिया एन्फ्लूएंसरबाबत त्याच्या वडीलांसह, शेजारी राहणाऱ्या लोकांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रान्शू यांने दिवाळीमध्ये, इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केली होती. शेअर केलेल्या रिलमध्ये, त्या एन्फ्लूएंसरने मेकअप करुन साडी परिधान केलेली दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याने अगदीच मुलींसारखे हावभाव दिलेली दिसत आहे. याच व्हिडीओवरुन त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नेमकी त्याने आत्महत्या का केली? त्याच्या हत्येमागील मुख्य कारण काय? याबद्दलची माहिती पोलिसांना मिळालेली नाही.