SW Monsoon 2023 in India: भारतामध्ये यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होणार; Skymet चा अंदाज
यंदा मान्सूनला विलंब झाल्यास तांदूळ, मका आणि कापूस यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या पेरणीवर परिणाम होण्याचा अंदाज आहे.
भारतामध्ये सध्या अनेक भागात उष्णतेच्या झळा बसत असल्याने नागरिकांना मान्सून कधी दाखल होतोय याचे वेध लागले आहेत. पण स्कायमेटचा (Skymet) अंदाज पाहता भारतामध्ये यंदा मान्सून उशिराने दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्यातही उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतील असा स्कायमेटचा अंदाज आहे. अद्याप आयएमडी कडून मान्सून दाखल होण्याच्या स्थितीबाबत, तारखेबाबत अंदाजपत्र समोर आलेले नाही मात्र लवकरच त्यांच्याअकडूनही माहिती दिली जाईल.
सामान्यपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये आणि 7 जूनला मुंबई सह कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल होतो. पण यंदा केरळ मध्येच मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला असल्याने पुढे महाराष्ट्रातही त्याचा प्रवास मंदावणार असल्याचा अंदाज आहे. Jatin Singh, founder-director of Skymet यांनी ट्वीट करत त्याबद्दल माहिती दिलेली आहे.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने पावसाच्या अंदाजपत्रावर शेतकर्यांच्या शेतीचं गणित अवलंबून आहे. यंदा मान्सूनला विलंब झाल्यास तांदूळ, मका आणि कापूस यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या पेरणीवर परिणाम होण्याचा अंदाज आहे.
पहा ट्वीट
गेल्या महिन्यात, स्कायमेटने जाहीर केलेल्या अंदाजपत्रानुसार, 2023 मध्ये भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. त्याचा परिणाम ग्रामीण उत्पन्न, आणि आर्थिक वाढीवर होणार आहे. स्कायमेट नुसार, भारतातील दुष्काळ किंवा कमजोर पावसाशी संबंधित एल निनो हवामानाच्या परिणामामुळे जून-सप्टेंबर हंगामात मान्सूनचा पाऊस सरासरीच्या (LPA) 94 टक्के असेल. Monsoon 2023: यंदा भारतात सामान्य मान्सून अपेक्षित; IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांचा अंदाज .
एल निनो ही एक हवामान घटना आहे ज्यामध्ये मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा वाढते. तापमानवाढीमुळे atmospheric patterns मध्ये बदल होतो, ज्यामुळे भारतीय उपखंडातील मान्सून सर्क्युलेशन कमी होते.