Singhu Border Murder: लखबीर सिंह याच्या हत्येप्रकरणी एका निहंगाचे आत्मसपमर्पण, आज कोर्टात हजर केले जाणार

अशातच शुक्रवारी आंदोलनाच्या ठिकाणी लखबीर नावाच्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आली.

Saravjeet Singh Surrenders. (Photo Credits: ANI)

Singhu Border Murder: सिंघु बॉर्डरवर गेल्या एका वर्षाहून अधिक काळ शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. अशातच शुक्रवारी आंदोलनाच्या ठिकाणी लखबीर नावाच्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आली. याच हत्येतील मुख्य आरोपी निहंग सिख याने आत्मसमर्पण केले आहे. त्याला आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. हत्येनंतर निहंग सिख याने तरुणाचे हात-पाय कापून बॅरिकेडवर लावले होते. असा आरोप लावला जात आहे की, रात्री मृत लखबीर निहंगो याचे कपडे घालून गुरुद्वारात आला होता.

असे सांगितले जात आहे की, गुरु ग्रंथ साहब यांच्यासोबत गैरवैतर्न केल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच गेटवर पहारा देणाऱ्या निहंगो ने त्या तरुणाला पकडले आणि त्याच्यासोबत मारहाण केली. त्याने केलेल्या गैरवर्तवणूकीबद्दल ही त्याला विचारण्यात आले. परंतु त्याने काही न सांगितले असता त्याचे प्रथम हात कापले आणि नंतर पाय कापून ते बॅरिगेटला लटकवले.(Chhattisgarh Shocker: दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या लोकांना वेगवान कारने चिरडले; पहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ)

तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव सरवजीत सिंह आहे. त्याने काल संध्याकाळी सोनीपत पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केले. शांतीपूर्ण सुरु असल्याचे सांगण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात ही घटना घडली आहे. त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा यांनी असे म्हटले की, त्यांचा या घटनेशी संबंध नसून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी.

तर मृत लखबीर हा पंजाब मधील तरनतारन जिल्ह्यातील चीमा खुर्द गावात राहणारा होता. ते निहंगांच्या घोड्यांची देखभाल आणि स्वच्छता करत असे. मात्र त्यांनीच त्याचा जीव घेतला. यामुळे तरुणाचा परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif