Shraddha Walkar Murder Case: 'फाशी झाली तरी हरकत नाही, स्वर्गात मिळेल हूर'; श्रद्धाच्या हत्येबाबत आफताबला पश्चाताप नाही, चौकशीदरम्यान केले धक्कादायक वक्तव्य
आफताबला पॉलीग्राफ चाचणीसाठी सोमवारी (28 नोव्हेंबर 2022) फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) मध्ये आणण्यात आले. या चाचणीनंतर पोलीस त्याला व्हॅनमधून तिहार कारागृहात घेऊन जात असताना तेथे उपस्थित लोकांनी दगडफेक करत त्याच्यावर तलवारीने हल्ला केला.
श्रद्धा वालकर मर्डर प्रकरणातील (Shraddha Walkar Murder Case) आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawalla) याने पॉलीग्राफ चाचणीनंतर प्रथमच धक्कादायक वक्तव्य केले आहे. दिल्लीत आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबने पोलिसांना सांगितले की, त्याला त्याच्या कृत्याबद्दल अजिबात पश्चाताप होत नाही. त्याला फाशी झाली तरी उत्तम आहे, कारण त्यामुळे त्याला स्वर्ग मिळेल. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
वृत्तात अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘आफताबने सांगितले की, श्रद्धाच्या हत्येसाठी त्याला फाशी दिली असली तरी त्याला त्याचा पश्चाताप होणार नाही, कारण तो स्वर्गात गेल्यावर त्याला हूर मिळेल.’ चौकशीदरम्यान त्याने पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की, श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करूनही आपल्याला कोणताही पश्चाताप झाला नाही. मुंबईतच श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोपीने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले.
एवढेच नाही तर श्रद्धासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याचे 20 हून अधिक हिंदू मुलींशी संबंध असल्याचेही त्याने पुढे सांगितले. तो बंबल अॅपवर हिंदू मुली शोधून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या हत्येनंतर एक खुलासा केला होता की, श्रद्धाला मारल्यानंतर आफताबने एका मानसशास्त्रज्ञ मुलीला आपल्या घरी बोलावले होते. तीही हिंदू होती. त्याने या मुलीला श्रद्धाची अंगठी भेट देऊन आपल्या जाळ्यात अडकवले. ती अंगठीही पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आफताबने पॉलीग्राफ टेस्टमध्ये असे काही सत्य उघड केले आहे, जे खूप धक्कादायक आहेत. आमची टीम नार्को चाचणीनंतर या तथ्यांची पुष्टी करू इच्छित आहे. पॉलीग्राफ चाचणीत त्याने जे सांगितले ते आम्हाला तपासात खूप मदत करत आहे. याद्वारे पोलिसांनी त्याच्या घरातून 5 चाकू जप्त केले आहेत. आम्हाला आशा आहे की लवकरच या प्रकरणाशी संबंधित इतर पुरावे देखील गोळा केले जातील.’ त्याचवेळी, ज्या दिवशी श्रद्धाची हत्या झाली, त्याच दिवशी आफताबने तिच्याशी भांडण करून गांजा खाल्ल्याचेही तपासात समोर आले आहे. (हेही वाचा: त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्यांचे 70 तुकडे करू; आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला; Watch Video)
श्रद्धा खून प्रकरणातील विखुरलेले दुवे जोडण्यात गुंतलेल्या पोलिसांची आफताबने पॉलिग्राफ चाचणीतही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने तीन वेळा पॉलीग्राफ चाचणीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, पण काही उत्तरे अर्धवट सोडली. 5 डिसेंबर 2022 रोजी आफताबची नार्को चाचणी होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पोलीस आधीच त्याचे प्रश्न तयार करत आहेत.
दरम्यान, आफताबला पॉलीग्राफ चाचणीसाठी सोमवारी (28 नोव्हेंबर 2022) फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) मध्ये आणण्यात आले. या चाचणीनंतर पोलीस त्याला व्हॅनमधून तिहार कारागृहात घेऊन जात असताना तेथे उपस्थित लोकांनी दगडफेक करत त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पोलीस व्हॅनजवळ उभे असलेले लोक आधी तलवारी फिरवताना आणि नंतर व्हॅनवर तलवारीने हल्ला करताना दिसत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)