Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडातील नवा खुलासा; जंगलात सापडलेल्या हाडांसोबत जुळले श्रद्धाच्या वडीलांचे DNA

हे दिल्ली एम्स रूग्णालयात होईल.

Shraddha Walkar Murder Case | Representational Image (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

भारताची राजधानी दिल्ली मधील महरौली भागात झालेला श्रद्धा वालकरचा मृत्यू सार्‍यांनाच हादरवणारी घटना होती. क्रुरतेची परिसीमा गाठणारा हा हत्याकांड दिवसेंदिवस नवनव्या खुलाशांमुळे चर्चेत आहे. आता यामध्ये झालेला अजून एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे दिल्ली पोलिसांना जंगलात सापडलेल्या हाडांसोबत श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए जुळला आहे. आज पोलिसांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

श्रद्धाच्या खून प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांना 20 नोव्हेंबर दिवशी मोठं यश मिळालं आहे. पोलिस टीम महरौली जंगलामध्ये पोहचली. तेथे मानवी खोपडी आणि जबड्याचा काही भाग सापडला. सोबतच मानवी शरीराचे अन्य देखील काही अवयव/हाडं सापडले. पोलिसांना हे अवशेष श्रद्धाचे असतील असा संशय होता. यावर आधारितच त्यांनी श्रद्धाच्या वडिलांची टेस्ट देखील करून घेतली होती. नक्की वाचा: Shraddha Walkar Murder Case: आफताब पूनावाला याचे पोलिसांनाच आव्हान, श्रद्धा वालकर हिच्या हत्येचे कारणही सांगितले .

दिल्ली पोलिस स्पेशल कमिशनर सागर प्रीत हुड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांकडे डीएनए टेस्टचा रिपोर्ट आणि पॉलिग्राफ टेस्टचा रिपोर्ट देखील आहे. अजूनही दोन रिपोर्ट्सची त्यांना प्रतिक्षा आहे. त्यापैकी एक नार्को टेस्ट आहे. नार्को टेस्टचा रिपोर्ट हा पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांची टीम आता श्रद्धाच्या ज्या हाडांची वडिलांसोबत डीएनए टेस्ट जुळली आहे त्याचे पोस्ट मार्टम देखील करून घेतले जाणार आहे. हे दिल्ली एम्स रूग्णालयात होईल. दरम्यान डीएनए टेस्ट साठी पोलिसांनी सीबीआयची मदत घेतली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.