Shocking Photos Of Sinking Joshimath: जोशीमठ 'सिंकिंग झोन' म्हणून घोषीत, खचणारी जमीन आणि भेगाळलेल्या भींती; पाहा धक्कादायक फोटो

इमातींच्या भिंतीनाही मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घटनांचे धक्कादायक वास्तव दाखवणारी छायाचित्रेही (Shocking Photos Of Sinking Joshimath) पुढे आली आहेत. इथे आम्ही त्यातील काही देत आहोत. पाहा हे धक्कादायक फोटो.

Shocking Photos Of Sinking Joshimath (Photo Credits: Twitter/ANI)

उत्तराखंड (Uttarakhand) राज्याच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा (Alakananda River) नदीच्या काठावर वसलेल्या जोशीमठ (Sinking Joshimath) हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रशासनाकडून हे गाव 'सिंकिंग झोन' (Sinking Zone) म्हणून नुकतेच घोषीत करण्यात आले.गावातील जमीन पाठिमागील काही दिवसांपासून अचानक खचू लागली आहे. त्यामुळे गावातील इमारती, मंदिरे जमीनीत खचू लागली आहेत. इमातींच्या भिंतीनाही मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घटनांचे धक्कादायक वास्तव दाखवणारी छायाचित्रेही (Shocking Photos Of Sinking Joshimath) पुढे आली आहेत. इथे आम्ही त्यातील काही देत आहोत. पाहा हे धक्कादायक फोटो.

जोशीमठ येथील परिस्थितीचा आढावा घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जोशीमठ भूस्खलन आणि भूस्खलनामुळे बाधित रहिवाशांना तात्काळ मदत आणि बचाव सुनिश्चित करताना परिसरातील सर्व चालू विकास कामांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाधित स्थानिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि परिसरातील सर्व विकास कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. (हेही वाचा, Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू, शोधमोहीम अद्यापही सुरुच)

Shocking Photos Of Sinking Joshimath (Photo Credits: Twitter/ANI)

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) हिमांशू खुराना यांनी नुकसानीच्या प्रमाणात मूल्यांकन करण्यासाठी बाधित भागात घरोघरी जाऊन पाहणी केली आणि ज्या घरांमध्ये भेगा पडल्या आहेत अशा रहिवाशांना मदत केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे. चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, जोशीमठ शहरातील 603 इमारतींना तडे गेले आहेत. एकूण ६८ कुटुंबे 'तात्पुरते' विस्थापित झाली आहेत.

Shocking Photos Of Sinking Joshimath (Photo Credits: Twitter/ANI)

चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत, हॉटेल माउंट व्ह्यू आणि मलारी इनला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय आणि निवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. जोशीमठ शहर क्षेत्रांतर्गत, 229 खोल्या तात्पुरत्या स्वरूपात राहण्यायोग्य म्हणून ओळखल्या गेल्या आहेत, त्यांची क्षमता अंदाजे 1271 आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 33 आणि 34 नुसार जीव आणि मालमत्तेच्या जोखमीचे मूल्यांकन केल्यानंतर, अतिप्रमाणात भूस्खलनाचा धोका असलेल्या आणि असुरक्षित समजल्या जाणार्‍या भागातून स्थानिकांना तातडीने बाहेर काढण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Shocking Photos Of Sinking Joshimath (Photo Credits: Twitter/ANI)

दरम्यान, भूस्खलनामुळे बाधित ठिकाणे ओळखण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि असुरक्षित कुटुंबांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाने रविवारी पीडित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसाठी आवश्यक सहाय्यता निधीचे वाटप केले. 46 बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसाठी 5,000 रुपये प्रति कुटुंब या दराने निधी वितरित करण्यात आला आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

Shocking Photos Of Sinking Joshimath (Photo Credits: Twitter/ANI)

इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (INSA) मधील एमेरिटस शास्त्रज्ञ, डीएम बॅनर्जी यांनी, जोशीमठ गाव आणि परिसरातील जमीन खचण्यास आणि प्रचलित परिस्थितीसाठी जवळच्या जलविद्युत प्रकल्पासाठी रस्ते आणि बोगदे बांधल्याबद्दल आणि विकासकामांच्या नावाखाली करण्यात आलेल्या बांधकामांना आणि खोदकामांकडे अंगुलीनिर्देश केला. जोशीमठ हा हिमालयाचा एक असा भाग आहे जो प्रीकॅम्ब्रियन कालखंडातील खडकांपासून बनला आहे. हे क्षेत्र भूकंपीय प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण रोखायला हवे. शिवाय इमारतीही तीन ते चार मजल्यांपेक्षा उंच नसाव्यात असे डीएम बॅनर्जी एएनआयशी बोलताना म्हणाले.