Shocking: फेसबुकवरील प्रियकरासाठी पती व 4 वर्षाच्या मुलाची हत्या; मृतदेहांसमोर केला Sex, वाचा प्रेम, सेक्स आणि हत्येची संतापजनक कहाणी

अर्चना व अजयला एकत्र राहायचे होते मात्र पती व मुलामुळे हे शक्य होत नव्हते. अखेर अर्चना व अजय यांनी ओम आणि 4 वर्षांच्या मुलाची हत्या करण्याची योजना बनवली. त्यानुसार एके रात्री हातोड्याचा वार करून अजयने ओमची हत्या केली, तर अर्चनाने आपल्या 4 वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

आई आणि मुलाचे (Son and Mother) नाते हे एक पवित्र मानले जाते. परंतु गोरखपूरमधून (Gorakhpur) आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका पत्नीने प्रियकराकरवी आपल्या पतीची हत्या करवली. यावेळी गाढ झोपेत असलेला तिचा चार वर्षांचा मुलगा आवाजाने जागा झाला. वडिलांची हत्या झाल्याचे पाहून तो घाबरला आणि समोर बसलेल्या आईला मिठी मारायचा प्रयत्न करू लागला. परंतु या निर्दयी आईने त्याचाही गळा दाबून खून केला.

महत्वाचे म्हणजे मुलगा आणि पतीच्या मृत्यूनंतर या महिलेने दोन्ही मृतदेहांसमोर आपल्या प्रियकरासोबत सेक्स केला. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील एका हायप्रोफाइल कुटुंबातील प्रेम, सेक्स आणि हत्येचे हे एक संतापजनक प्रकरण आहे.

माहितीनुसार, अर्चना यादव नावाच्या या महिलेचा विवाह 2009 मध्ये गोरखपूर येथील बालरोग विशेषज्ञ ओम प्रकाश यांच्याशी झाला होता. ओम प्रकाश यांनी अर्चनासोबत दुसरे लग्न केले होते. अर्चना ही मुळची लखनौची रहिवासी असून, तिचे वडील तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सुरक्षा दलाचा भाग होते, अर्चनाचे कुटुंब लखनौमधील मोठ्या कुटुंबांपैकी एक आहे.

लग्नानंतर अर्चना काही काळ सासरच्या मंडळींसोबत राहिली, पण नंतर तिने ओमप्रकाशकडे वेगळे राहण्याचा हट्ट धराला. इच्छा नसतानाही पत्नीच्या आग्रहापुढे डॉ.ओमप्रकाश कुटुंबापासून दूर राहू लागले. ओम आणि अर्चना यांना एक मुलगा आहे. कालांतराने सर्व काही ठीक चालले असले तरी, अर्चना आणि ओममध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. अर्चना अनेकदा तिच्या फोनवर व्यस्त असायची. तिचे ना मुलाकडे लक्ष होते, ना घरकामात. डॉ.ओम यांनी तिला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकवेळी ती उडवा उडवीची उत्तरे देत असे.

अर्चनाची फिरोजाबादच्या अजय यादवशी फेसबुकवरून मैत्री झाली होती आणि ती त्याच्याशी तासन् तास फोनवर बोलत असे. अजय यादव हा फिरोजाबाद येथील एका खाजगी शाळेत शिक्षक होता. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले. जसजशी ती अजयच्या जवळ येऊ लागली, तसतसे ती पती व आपल्या मुलापासून दूर जाऊ लागली. हळूहळू अर्चनाचे अजय यादवशी भेटणे वाढले. माहेरी जाण्याच्या बहाण्याने ती प्रियकराला भेटण्यासाठी लखनऊला जात असे. या दोघांच्यामध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते.

अर्चना व अजयला एकत्र राहायचे होते मात्र पती व मुलामुळे हे शक्य होत नव्हते. अखेर अर्चना व अजय यांनी ओम आणि 4 वर्षांच्या मुलाची हत्या करण्याची योजना बनवली. त्यानुसार एके रात्री हातोड्याचा वार करून अजयने ओमची हत्या केली, तर अर्चनाने आपल्या 4 वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोघांनी मृतदेहांसमोर सेक्स केला. नंतर घरात चोरी झाली आहे असे दाखवण्यासाठी घरातील सर्व सामान विखरून ते फरार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील इतर सदस्य आले तेव्हा घराची अवस्था पाहून ते थक्क झाले. (हेही वाचा: Chandigarh Shocker: आईने एका दिवसाच्या मुलीला जमिनीत जिवंत गाडले, चिमुकलीचा मृत्यू)

कुटुंबीयांनी ताबडतोब घडल्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलीस देखील तातडीने या प्रकरणाच्या तपासात गुंतले. अखेर अर्चनाचा फोन नंबर आणि फेसबुक अकाऊंटवरून या प्रकरणाचा सुगावा लागला. पोलिसांनी अजय यादवला अटक केली आणि त्यानंतर त्याने संपूर्ण सत्य उघड केले. या घृणास्पद कृत्यासाठी अर्चनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now