Shocking! दारू पार्टीमध्ये हरपली शुद्ध; नशेत तीन मित्रांनी चक्क साप भाजून खाल्ला, जाणून घ्या काय घडले पुढे

या कालव्याजवळ बसून तीन मित्र पार्टी करत असताना त्यांच्याकडून हे कृत्य घडले. पार्टी करत असताना त्यांना जवळच्या झाडीतून साप निघालेला दिसला. त्याला यांनी पकडले आणि त्याचे तोंड व शेपूट कापून टाकले

Shocking! दारू पार्टीमध्ये हरपली शुद्ध; नशेत तीन मित्रांनी चक्क साप भाजून खाल्ला, जाणून घ्या काय घडले पुढे
Snake | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

दारू प्यायल्यानंतर बहुतेक लोक शुद्धीत राहत नाहीत. अशावेळी अनेकदा काही घटना घडतात ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. दारूच्या नशेत कोणी विनाकारण भांडण सुरु करतो, तर कोणी जिथे असेल तिथेच गोंधळ घालतो. मद्यपींबद्दल असे अनेक विचित्र किस्से ऐकायला आणि बघायला मिळतात. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या धौलपूरमध्ये तीन मित्रांनी दारू पार्टी केली होती आणि त्यादरम्यान त्यांना एक साप (Snake) दिसला. साप पाहून कोणीही घाबरले नाही, उलटे तिघांनी चक्क तो साप भाजून खाल्ला.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांचा यावर विश्वास बसत नाहीये, परंतु ती खरी आहे. हे तीन मित्र दारू पार्टीवेळी इतके टल्ली झाले होते की, त्यांना आपण काय करत आहोत याची शुद्ध नव्हती. पार्टीदरम्यानच त्यांनी साप पाहिला आणि त्याला पकडून त्याचे तीन भाग केले. त्यानंतर तो भाजून खाल्ला. त्यानंतर यातील एकाची प्रकृती इतकी बिघडली होती की, तो 12 तास बेशुद्ध पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पिपरीपुरा कालव्याजवळ घडली. (हेही वाचा: आंध्र प्रदेशमध्ये पावसामुळे जुनी इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्यात 4 हून अधिक लोक अडकल्याची भीती)

या कालव्याजवळ बसून तीन मित्र पार्टी करत असताना त्यांच्याकडून हे कृत्य घडले. पार्टी करत असताना त्यांना जवळच्या झाडीतून साप निघालेला दिसला. त्याला यांनी पकडले आणि त्याचे तोंड व शेपूट कापून टाकले. मग त्यांनी तो  आगीत भाजून खाल्ला. या तिघांपैकी ज्याची तब्येत बिघडली त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर या तिघांनी साप खाल्ल्याची बातमी बाहेर आली. दरम्यान, नुकतेच ओडिशा पोलिसांनी 1 किलोपेक्षा जास्त सापाचे विष जप्त केले आहे, ज्याचे बाजार मूल्य सुमारे 1.50 कोटी रुपये आहे आणि या संदर्भात दोघांना अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.

(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2021 08:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).