Tamil Nadu Crime: धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेत बाळाला दिला जन्म

शौचालयात गेल्यानंतर तिने तिथे बाळाला जन्म दिला, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

सरकारी शाळेच्या (Government School) शौचालयाजवळ शाळा प्रशासनाला एका बाळाचा मृतदेह आढळला. संबंधित घटनेची माहिती शाळा प्रशासनाने पोलिसांना (Police) दिली. पोलिसांना तपास केला असता ते अर्भक शाळेतील अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं असल्याची माहिती मिळाली आहे. तरी पोलिस या धक्कादायक प्रकाराचा पुढील सखोल तपास करीत आहेत. संबंधित 16 वर्षीय मुलीला पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असुन तिला गर्भधारणा करणाऱ्या व्यक्तीचा तपास करीत आहेत. तरी मुलीच्या चौकशी दरम्यान शाळेजवळ सापडलेल्या अर्भकास तिने जन्म दिला असल्याची माहिती पोलिसांना दिली.

 

तसेच शाळेत शिकवणी सुरु असाताना तिला अचानक प्रसूतीचा (Delivery Pain) त्रास जाणवू लागला आणि ती ताबडतोब शौचालयात (Toilet) गेली. शौचालयात गेल्यानंतर तिने तिथे बाळाला जन्म दिला. दरम्यान ते अर्भक जिवंत होत, पेनच्या साहाय्याने तिने  बाळाची नाळ कापली आणि या सगळ्या प्रकारानंतर ती पुन्हा वर्गात आली अशी धक्कादायक माहिती या पिडीत मुलीने पोलिसांना दिली आहे. पण पोलिसांच्या माहितीनुसार प्रसुती  दरम्यान तिच्या बरोबर कुणी नसल्यानं हे अर्भक जिवंत नसल्याची शक्यता पोलिसांनी (Police) व्यक्त केली आहे. (हे ही वाचा:- Crime: शुल्लक कारणांवरून आईला मारहाण करणाऱ्या वडिलांची हत्या, 17 वर्षीय मुलगा अटकेत)

 

संबंधित प्रकाराबाबत तसेच मुलीच्या गर्भधारनेबाबत कुणालाही माहिती नसल्याची कबुली मुलीने पोलिसांना दिली आहे. तरी पोलिसांनी तिच्या कुटुंबिय, नातेवाईक, गावकरी आणि काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या सर्वाची सखोल चौकशी (Investigation) केली जात आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार तमिळनाडू (Tamil Nadu) मधील कुड्डालोर (Cuddalore) या गावात घडला असुन तमिळनाडू पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.