Shocking! 21 दिवसांच्या मुलीच्या पोटातून बाहेर काढले 8 अविकसित भ्रूण; डॉक्टरांनाही बसला आश्चर्याचा धक्का

ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते म्हणाले की, लहान मुलीच्या पोटातून गर्भ काढण्याची जगभरात 200 पेक्षा कमी प्रकरणे आढळली आहेत. परंतु 21 दिवसांच्या नवजात मुलीच्या पोटातून 8 भ्रूण बाहेर काढणे ही अतिशय आश्चर्यकारक गोष्ट आहे.

Shocking! 21 दिवसांच्या मुलीच्या पोटातून बाहेर काढले 8 अविकसित भ्रूण; डॉक्टरांनाही बसला आश्चर्याचा धक्का
Representational Image (Photo Credits: Pixabay)

झारखंडमध्ये (Jharkhand) असे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. याठिकाणी बुधवारी एका 21 दिवसांच्या नवजात मुलीच्या पोटातून 8 भ्रूण (Embryos- Infant Baby) काढण्यात आले आहे. रामगढ येथील रहिवासी असलेल्या या मुलीचा जन्म 10 ऑक्टोबर रोजी झाला होता. सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या पोटात ट्यूमर असल्याचे आढळून आले. मुलीला उपचारासाठी तिला राणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु जेव्हा ऑपरेशन झाले तेव्हा तिच्या पोटातून 8 अविकसित भ्रूण काढण्यात आले.

न्यूजट्रॅकने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते म्हणाले की, लहान मुलीच्या पोटातून गर्भ काढण्याची जगभरात 200 पेक्षा कमी प्रकरणे आढळली आहेत. परंतु 21 दिवसांच्या नवजात मुलीच्या पोटातून 8 भ्रूण बाहेर काढणे ही अतिशय आश्चर्यकारक गोष्ट आहे. राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा रांची येथील राणी चिल्ड्रन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केला आहे.

डॉक्टरांनी सांगितले की फीट गर्भामुळे (Feet Fetus) पोटात गर्भ तयार होतो. देशात केवळ 10 फीट गर्भ प्रकरणांची नोंद झाल्याचेही सांगण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की अत्यंत भिन्न टेराटोमा (हा जर्म सेल ट्यूमरचा एक प्रकार आहे. हा ट्यूमर पुनरुत्पादक पेशींमध्ये सुरू होतो) हे देखील यामागचे एक कारण असू शकते. टेराटोमालामध्ये पेशी मुलीच्या आत जाऊन भ्रूणाचे रूप धारण करतात. हे जुळे बाळ आपल्याच भावाच्या किंवा बहिणीच्या पोटात वाढते. (हेही वाचा: अनोखे लग्न! अडीच फुटाचा वर आणि 2 फुटाची वधू, अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा, लग्नाचे व्हिडीओ व्हायरल)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही दुर्मिळ स्थिती 10 लाख मुलांपैकी एकामध्ये आढळते. फीट फिटसमध्ये बाळाच्या पोटात नवीन गर्भाची निर्मिती सुरू होते. आईच्या गर्भाशयात एकापेक्षा जास्त मुले वाढत असतील, तर गर्भाच्या विकासामुळे पोटातील बाळाच्या आत ज्या पेशी जातात, त्या गर्भाची निर्मिती बाळाच्या पोटात सुरु होते. मात्र या पेशी बाळामध्ये कसा प्रवेश करतात याबद्दल कोणतेही ठोस कारण नाही.

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2022 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).