Sanjay Raut meets Rakesh Tikait: शिवसेना खासदार संजय राऊत आणि राजेश टीकैत यांच्यात भेट, मुजफ्फरनगर येथे बंद दाराआड चर्चा

विविध राजकीय पक्ष आपापला पाया मजबूत करुन जनमत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना (Shiv Sena) हा पक्षसुद्धा यात पाठीमागे नाही. शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये 50 ते 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

Sanjay Raut, Rakesh Tikait | (Photo Credits-Twitter)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Elections 2022) कार्यक्रम जाहीर होताच राजकीय समिकरणांना वेग आला आहे. विविध राजकीय पक्ष आपापला पाया मजबूत करुन जनमत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना (Shiv Sena) हा पक्षसुद्धा यात पाठीमागे नाही. शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये 50 ते 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्यादृष्टीने चाचपणी करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पश्चिम उत्तर प्रदेशचा दौरा केला. या दौऱ्यात संजय राऊत यांनी मुजफ्फरनगर येथे सर्कुलर रोड येथील निवास्थानी जाऊन भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत ( Rakesh Tikait) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीन तास बंद दाराआड चर्चा झाली.

राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ही औपचारीक भेट होती. दरम्यान, राजकीय वर्तुळात मात्र ही अनौपचारीक मानले जात आहे. राकेश टिकैत यांनीही स्पष्ट शब्दांमध्ये म्हटले की, संजय राऊत हे त्यांचे मित्र आहेत. ते औपचारीकपणे मला भेटायला आले होते. फार काही न बोलता प्रसारमाध्यमांना बगल देत हे दोन्ही नेते बंद दाराआड चर्चेसाठी निघून गेले. (हेही वाचा, Dara Singh Chauhan Resigns: भाजपचा पाय खोलात, युपीमध्ये योगी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा)

राजकीय वर्तुळातून अंदाज लावला जात आहे की, राकेश टिकैत यांच्याकडे शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी पाठिंबा मागण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, आमची लढाई भाजपसोबत आहे. शिवसेना सामान्य माणसांचा पक्ष आहे. या निवडणुकीत आम्ही 50 ते 100 जागा कोणासोबतही युती न करता लढणार आहोत. त्यांनी म्हटले की, राकेश टिकैत हे मोठे शेतकरी नेते आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचे काही प्रमुख प्रश्न आहेत. या मुद्द्यांवर टिकैत यांच्याशी चर्चा होईल. संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले की, आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये लढण्यासाठी शेतकऱ्यांचा आशीर्वाद हवा आहे.

ट्विट

शेतकरी आंदोलनादरम्यान संजय राऊत हे मुंबईतून गाजीपूर बॉर्डर येथे गेले होते. तेथे आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना भेटले होते. तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्याचे शिवसेनेने समर्थनही केले होते. या दरम्यान, संजय राऊत आणि राकेश टिकैत यांच्यात चर्चा झाली होती. शेतकरी आंदोलनानंतर ही दुसरी वेळ आहे जेव्हा संजय राऊत टिकैत यांना भेटण्यासाठी मुजफ्फरनगर येथे पोहोचले आहेत.



संबंधित बातम्या