Sharad Pawar On Manipur Issue: मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचे विचलित करणारे- शरद पवार

मणिपूर राज्यात जातीय हिंसाचाराने अत्युच्च टोक गाठले आहे. मदमस्त झालेला जमाव अनियंत्रीतपणे अत्याचार करतो आहे. राज्यातील एका जमातीच्या दोन महिलांची नुकतीच नग्न धिंड काढण्यात आली. ज्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालया अवाहन केले आहे.

PM Narendra Modi Vs. Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sharad Pawar Appeal To PMO: मणिपूर पाठिमागील अनेक दिवसांपासून धुमसते आहे. जातीय हिंसाचार आणि दंगली नित्याचे होऊन बसले आहे. असे असतानाच जमावाने एका जमातीच्या दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढली. त्यांच्या गुप्तांगाना किळसवाना स्पर्श केला. त्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने मणिपूर (Manipur Issue) राज्यात शांतता प्रस्तापीत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले तातडीने उचलण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ''मानवतेशिवाय तुमचा गौरव निरर्थक आहे'' हा विचार पत्रात उल्लेख करत समाजमाध्यमातून खडेबोलही सुनावले आहेत. मणिपूरमधील विशेषत: महिलांवरील अत्याचाराचे विदारक दृश्य पाहून दुःख झाले. हे दृश्य अतिशय 'घृणास्पद' आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मणिपूरच्या नागरिकांचे हित आणि तेथील लोकांच्या न्याया दृष्टीने आणि देशहीत डोळ्यासमोर ठेऊन एकजूट होण्याची हीच ती वेळ आहे. मणिपूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्तापीत करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी गृह विभागाने पंतप्रधान कार्यालयासह तातडीने आवश्यक कारवाई करण्याची गरज आहे,'' असे पवार यांनी ट्विट केले. (हेही वाचा, Manipur Women Naked Parade: मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड; आरोपींवर कडक कारवाईची मागणी)

ट्विट

मणीपूर घटना: सुप्रिया सुळे यांची कारवाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ट्विट

मणिपूर हिंसा- शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी आक्रमक

मणिपूरमध्ये जे काही घडते आहे. त्यावरुन शिवसेना (UBT) पक्षाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदीही आक्रमक झाल्या आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या मणिपूरमध्ये दोन महिलांच्या नग्न परेडच्या व्हायरल व्हिडिओवरून देशभरात गदारोळ होत आहे. अशा घटनांमुळे देशाला लाज वाटते, मान खाली घालावी लागत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ईशान्य राज्याच्या परिस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. वाचकांच्या माहितीसाठी असे की, संसदेचे पावसाळी अधिवेशन आज (20 जुलै) सकाळी 11 वाजता सुरु होत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now