शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार (Watch Video)
आज, दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या उपस्थितीत त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली.
New Delhi: भारताचे 46वे माजी सरन्यायाधीश रंजन गोगई (Ranjan Gogoi) यांचा कार्यकाळ संपताच आता सरन्यायाशीध पदाचा कारभार शरद बोबडे (Sharad Bobde) यांनी स्वीकारला आहे. आज, दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या उपस्थितीत त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. यासोबतच शरद बोबडे हे 47 वे भारताचे सरन्यायाधीश म्ह्णून अधिकृत रित्या नेमण्यात आले आहेत. (नवे सरन्यायाधीश शरद बोबडे या मराठी माणसाच्या आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?)
आजवर देशातील अनेक ऐतिहासिक आणि महत्वाच्या निर्णयात बोबडे यांचा सहभागात होता, अलीकडेच लागलेल्या अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रकरणी सुद्धा ते रंजन गोगई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात सहभागी होते.
ANI ट्विट
शरद बोबडे हे 1978 साली त्यांनी काउंसिल ऑफ महाराष्ट्र मध्ये समील झाले. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कायद्याची प्रॅक्टिस केली. 1998 मध्ये वरिष्ठ वकिल पदाचा कारभार सांभाळल्यानंतर 2000 मध्ये त्यांनी बॉम्बे हायकोर्टात त्यांनी अतिरिक्त न्यायाधीशपद म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. बोबडे यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्ह्णून देखील काम केले आहे तर 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी त्यांना ,मिळाली. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त होणार असून, यानुसार पुढील दोन वर्षे ते सरन्यायाधीश म्हणून काम करणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश पदाचा कारभार सांभाळला होता. चंद्रचूड यांनी 7 वर्ष 4 महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते. तर नुकतेच रंजन गोगई यांनी 13 महिने सरन्यायाधीश पदाचा कारभार सांभाळल्यानंतर 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले आहेत.