Sexual Exploitation: लैंगिक शोषण केल्याचा बदला; तरुणाची भोसकून हत्या, मृतदेह जाळला

तसेच, मृतदेह कोरडे गवत आणि कपाड टाकून जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना दिल्ली येथील निजामुद्दीन (Nizamuddin) परिसरात घडली. घटनेतील मृत हा 25 वर्षांचा आहे.

Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

लैंगिक शोषण (Sexual Exploitation) केल्याचा राग मनात धरुन तीन अल्पवयीन आरोपींनी एकाची भूसकून हत्या केली आहे. तसेच, मृतदेह वाळके गवत आणि कपाड टाकून जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना दिल्ली येथील निजामुद्दीन (Nizamuddin) परिसरात घडली. घटनेतील मृत हा 25 वर्षांचा आहे. हजरत निजामुद्दीन पोलीसांनी (Hazrat Nizamuddin Police Station) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हे कृत्य त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि शोषणाचा बदला घेण्याच्या हेतूने केली, अशी प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक असे की, आरोपी हे अल्पवयीन असून केवळ 16 ते 17 वयोगटातील आहेत. सर्व आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

सर्व आरोपी 16 ते 17 वयोगटातील

वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सदर घटना 23 डिसेंबरच्या रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटवली. तसेच, तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, तातडीने कारवाई करत पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. ज्यामध्ये हे आरोपी 16 ते 17 वयोगटातील आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आझाद नावाच्या एका आरोपीने कृत्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, तिघांनी मिळून 25 वर्षीय तरुणाची हत्या केली. हे कृत्य त्यांनी 12 डिसेंबर रोजी रात्री केले.

आरोपींनी वाळके आणि सुखलेले गवत आणि कापड यांचा वापर करुन मृतदेहास आग लावली. पुराव आणि मृतदेह नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र, तो पूर्ण सफल झाला नाही. आरोपींकडील चौकशी आणि कबुली जबाब घेतल्यानंतर पोलीस आरोपींसह खुसरो पार्कजवळील गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांना, अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. जो बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर एम्समध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. (हेही वाचा, Pune Crime News: पत्नीच्या छातीवर बुक्क्यांचा प्रहार, जेवण न दिल्याने हत्या; पतीकडून कृत्य)

आरोपींकडून हत्या आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी तिनही आरोपींवर हत्या आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन एफआयआर नोंदवला आहे. तसेच, आरोपींनी खुनात वापरलेले हत्यार, दगड आणि काठी यांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, हजरत निजामुद्दीन पोलिस स्टेशनमध्ये या आधी अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये या घटनेतील मृत व्यक्तीविरोधात एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी हत्येसाठी वापरलेले हत्यार, दगड आणि एक काठी आम्ही जप्त केली आहे. दरम्यान, सांगितले जाते की, घटनेतील मृतावर या आधीही लैंगिक शोषण किंवा गैरवर्तनाचे आरोप झाले होते. त्याबातब पोलिस दप्तरी नोंदही झाली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif