COVID-19 Vaccine: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने Covishield लसीच्या वापरासाठी DCGI कडे केली मागणी

ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे.

Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर अद्याप सुरु असून अजूनही देशातील कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. त्याला मुख्य कारण कोरोनावर अजून यशस्वी लस आली नाही हे आहे. ही लस (COVID-19 Vaccine) भारतात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून याबाबतीत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Constitute Pune) एक पाऊल पुढे टाकले आहे. कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सीरम कंपनीने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे परवानगी मागितली आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे.

संपूर्ण देश कोरोनावर आपत्कालीन लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी आतुरतेने वाट पाहात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची आपत्कालीन लस लवकरच येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी कोरोना लसीच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी मोदींनी देशातील 3 इन्स्टिट्यूटला भेटही दिली होती.हेदेखील वाचा- Covaxin लस घेऊनही कोविड-19 ची बाधा झालेले हरियाणाचे गृहमंत्री Anil Vij यांनी लसीबद्दल दिली 'ही' महत्त्वपूर्ण माहिती

मिडिया रिपोर्टनुसार, विस्तृत स्तरावर वैद्यकीय गरजा आणि जनहित यांचा हवाला देत सीरमने कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. याआधी शनिवारी अमेरिकी औषध निर्माती कंपनी फायझरने केंद्र सरकारकडे भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे.

भारतात कोरोनाचे आणखी 36,011 रुग्ण आढळले असून 482 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे देशातील COVID19 चा आकडा 96,44,222 वर पोहचला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif