Sensex 500 अंकांनी गडगडला, Exit Poll सरकारच्या विरोधात गेल्याचा परिणाम
तर निफ्टी 185 अंकांनी कोसळला. निफ्टीची 10,508.70 अंकावर सुरूवात झाली आहे.
भारतातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलचा (Exit Poll) परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. आज (सोमवार) शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्स (Sensex) आज सकाळी 478.59 अंकांनी घसरून 35,204.66 वर आला आहे. तर निफ्टी 185 अंकांनी कोसळला. निफ्टीची 10,508.70 अंकावर सुरूवात झाली आहे.
नुकत्याच मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश या राज्यांचा एक्झिट पोल शुक्रवारी उशिरा जाहीर करण्यात आले आहेत. उद्या म्हणजे 11 डिसेंबरला या राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल घोषित होणार आहे.
सेंसेक्सच्या 30 पैकी 20 शेअर्स तेजीमध्ये आहेत. यामध्ये कोटक बॅंक (8.53 %), अडानी पोर्ट्स (2.71 %), बजाज ऑटो (2.23 %), इंफोसिस (1.92 %) एशियन पेंट्स (1.82 %)सर्वाधिक तेजीमध्ये आहेत.
रुपया घसरला
शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम रूपयावरही झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 71.41 पर्यंत पोहचला आहे. मागील महिन्यात नोव्हेंबर 20 च्या तुलनेत रुपयामध्ये झालेली घसरण सर्वात मोठी आहे.