संविधानाच्या प्रस्तावनेतून 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटवण्याची RSS ची मागणी
नुकत्याच आरएसएस संघाचे प्रमुख नेता नंदकुमार यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.
भारताच्या संविधानामधून धर्मनिरपेक्ष हा शब्द हटवण्याची मागणी आरएसएस संघटनेकडून करण्यात आली आहे. नुकत्याच आरएसएस (RSS) प्रमुख नेता नंदकुमार यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. नंदकुमार यांचे असे म्हणणे आहे की, भारताने धर्मनिरपेक्ष या शब्दावर पुन्हा विचार करावा. तर हा शब्द पाश्चिमात्यांकडून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तविकरित्या पोप यांच्या प्रभुत्वाच्या विरोधात आहे.
आरएसएसच्या पुस्तक प्रदर्शन सोहळ्यावेळी नंदकुमार यांनी धर्मनिरपेक्ष या मुद्द्यावर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी असे म्हटले की, भारतात धर्मनिरपेक्ष हा शब्दाची गरज नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष याबाबत बोर्ड लावण्याची खरच गरज आहे का? आपल्याला काम, व्यवहार आणि भुमिकेच्या माध्यमातून ही गोष्ट सिद्ध करुन दाखवावी लागणार आहे. त्याचसोबत संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाच्या अस्तिवाची गरज नसून ते संविधाच्या संस्थापकांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असे ही म्हटले की, बाबासाहेब आंबेडकर, कृष्ण स्वामी अय्यर यांच्या अन्य जणांनी सुद्धा याच्या विरोधात आवाज उठवला होता.(Republic Day Parade 2020: प्रजासत्ताक दिन परेड साठी महाराष्ट्र, केरळ यांना वगळून 'या' 16 राज्यांच्या चित्ररथाला मिळाली संधी; संरक्षण दलाने जाहीर केली यादी)
तर 1976 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांनी धर्मनिरपेक्ष शब्दावर जोर दिला त्यावेळी आंबेडकर यांनी त्याचा अस्विकार केला होता. तर आरएसएस संविधानामधील प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी भाजवर दबाब टाकू शकतो.