SEBI Action: अनिल अंबानी यांच्यासह रिलायन्स होम फायनान्स कंपनीवर कारवाई, इतर तिंघांवरही प्रतिबंध
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of Indi) अर्थातच सेबी (SEBI) ने रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of Indi) अर्थातच सेबी (SEBI) ने रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सेबीने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (Reliance Home Finance Company) या कंपनीला कथीत गैरव्यवहार केल्यााबत निर्बंध लागू केले आहेत. सेबीने ही कारवाई अनिल अंबानी यांच्यासह इतर तिघांवरही केली आहे. या तिघांमध्ये अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश आर शाह यांचा समावेश आहे.
सेबीने म्हटले आहे की, नियामकने आपल्या अंतरीम आदेशात म्हटले आहे की, सेबीसोबत नोंदणीकृत कोणत्याही समभागांची मध्यस्थी, कोणत्याही नोंदणीकृत सार्वजनिक कंपनी किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कंपनिच्या कार्यवाहक निदेशक/प्रवर्तकांसोबत स्वत:ला संबंधित करण्यावर प्रतिंबद लावला आहे. जे मालमत्ता, संपत्ती जमावकरण्याचा हेतू बाळगतात. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. (हेही वाचा, महाबळेश्वरमध्ये उद्योगपती Anil Ambani व कुटुंबियांकडून महामारी निर्बंधांचे उल्लंघन; प्रशासनाने केली मोठी कारवाई)
रिलायन्स होम फायनान्स ही अनिल अंबानी यांची कंपनी आहे. रिलायन्स होम फायनान्स सोबत शेअरवरही मोठ्या प्रमाणावर दबाव आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या कंपनीचा शेअर 1.40% घसरुन तो 4.93 रुपयांवर आला. कंपनीच्या मार्केट कॅपीटलबाबत बोलायचे तर ते 238.89 कोटी रुपये आहे.