Scoot Airline कंपनीच्या विमानाचे 35 प्रवाशांना जमिनीवर विसरुन हवेत उड्डाण, DGCA कडून चौकशिचे आदेश

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्कूट एअरलाइन्स (Scoot Airline) कंपनीकडे अहवाल मागवला आहे. स्कूट एअरलाइन्स कंपनीच्या विमानाने अमृतसर (Amritsar Airport) विमानतळावरुन सिंगापूरसाठी उड्डाण भरले. या विमानाने निश्चित वेळेच्या काही तास आगोदरच सिंगापूरसाठी (Singapore) उड्डाण भरले.

Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्कूट एअरलाइन्स (Scoot Airline) कंपनीकडे अहवाल मागवला आहे. स्कूट एअरलाइन्स कंपनीच्या विमानाने अमृतसर (Amritsar Airport) विमानतळावरुन सिंगापूरसाठी उड्डाण भरले. या विमानाने निश्चित वेळेच्या काही तास आगोदरच सिंगापूरसाठी (Singapore) उड्डाण भरले. परिणामी या विमानाचे तिकीट घेतलेले 35 प्रवाशी पाठिमागेच राहिले. प्रवाशांना सोडून निश्चित वेळेच्या आगोदर विमानाने उड्डाण भरलेच कसे? याबाबत चौकशी करुन अहवाल द्यावा, असे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) स्कूट एअरलाईन्सला दिले आहेत.

स्कूट एअरलाईन्स कंपनीचे विमान अमृतसर विमानतळावरुन बुधवारी (18 जानेवारी) निश्चित वेळेनुसार सायंकाळी 7.55 वाजता उड्डाण भरणार होते. मात्र, या विमानाने बुधवारी दुपारी 3.00 वाजता अचानक उड्डाण भरले. वेळे आधी या विमानाने उड्डाण भरलेच कसे? आणि त्यापाठिमागे नेमके काय कारण होते? याबाबत निश्चित माहिती पुढे येऊ शकली नाही. त्यामुळे डीजीसीएने स्कूट एअरलाईन्सकडे अहवाल मागवला आहे. (हेही वाचा, Go First Flight Forgets Passengers: 50 प्रवाशांना खालीच विसरुन 'विमान उडाले आकाशी', DGCA ने मागवला अहवाल)

अमृतसर विमानतळावरून बुधवारी संध्याकाळी ७.५५ वाजता निघालेले स्कूट एअरलाइनचे उड्डाण त्याच्या सुटण्याच्या वेळेच्या काही तास अगोदर दुपारी ३ वाजता उड्डाण घेतल्यानंतर उड्डाण नियामक प्राधिकरणाने चौकशी सुरू केली.

स्कट एअरलाईन्सचे विमान निश्चित वेळेच्या आधीच गेल्यामुळे विमानतळावर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले. त्यांनी विमानतळावरील संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार नोंदवली. मानतळ संचालकांनी वृत्तसंस्था एएनायला दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 280 प्रवासी सिंगापूरला जाणार होते, परंतु 30 हून अधिक प्रवाशांना मागे ठेवून आणि वेळापत्रकात अचानक बदल करुन 253 प्रवाशांचे विमान हवेत झेपावले.

घडल्या प्रकारामुळे डीजीसीएने नाराजी व्यक्त करत कडक भुमिका घेतली आहे. DGCA ने स्कूट एअरलाइन (जी सिंगापूरची कमी किमतीची एअरलाइन आहे) आणि सिंगापूर एअरलाइन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी तसेच, अमृतसर विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून तपशील मागवला आहे.

दरम्यान, एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रवाशांना वेळेत बदल झाल्याची माहिती ईमेलद्वारे देण्यात आली होती. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, ट्रॅव्हल एजंटच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. ज्या एका गटातील 30 लोकांसाठी या ट्रॅव्हल्स एजंटने तिकिटे बुक केली होती त्याने या प्रवाशांना फ्लाइटच्या वेळेत बदल केल्याबद्दल माहिती दिली नाही. ज्यामुळे एअरलाइनने वेळेवर हजर राहिलेल्या प्रवाशांसह उड्डाण केले.

दरम्यान, बेंगळुरू विमानतळावर नुकतीच अशीच एक घटना घडली होती. गो फर्स्ट कंपनीच्या दिल्ली-ला जाणार्‍या विमानाने 55 प्रवाशांना विसरुन हवेत उड्डाण भरले होते. या घटनेत हे 55 प्रवासी शटल बसने विमान पकडण्यासाठी निघाले होते. मात्र, बसमधील प्रवाशांना मागे ठेऊन विमानाने टेक ऑफ केले होते. या घटनेनंतर डीडीसीएने गो फर्स्ट एअरलाइन्सच्या चीफ ऑपरेशन ऑफिसरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीशीत नियामक दायित्वांचे पालन न केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी कारवाई का केली जाऊ नये, असा सवालही विचारला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now