पाळीव कुत्र्याला घाबरून Swiggy Delivery Boy ने तिसर्या मजल्यावरून मारली उडी; गंभीर दुखापतींमुळे प्रकृती चिंताजनक
पाळीव कुत्र्याला (Pet Dog) घाबरून स्विगीच्या एका डिलेव्हरी बॉयने (Swiggy Delivery Boy) तिसर्या मजल्यावरून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. 23 वर्षीय मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) याच्यावर कुत्रा भुंकत असल्याने त्याने उडी मारल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना हैदराबाद मधील असून बंजारा हिल्स मध्ये फूड डिलेवरीसाठी तो आला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, डिलेव्हरी बॉय Lumbini Rock Castle apartment मध्ये तिसर्या मजल्यावर पार्सल देण्यासाठी गेला होता. त्याने जेव्हा दरवाजा ठोठावला तेव्हा जर्मन शेफर्ड कुत्रा त्याच्या अंगावर आला आणि भुंकायला लागला. कुत्र्याच्या भीतीतून रिझवानने तिसर्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. फ्लॅट मालक शोभना यांनी रूग्णवाहिका बोलावून रिझवानला Nizam's Institute of Medical Sciences रूग्णालयात दाखल केले. नक्की वाचा: Gurugram Shocker: पाळीव कुत्र्याचा शेजाऱ्यावर हल्ला, मालकाने केले दुर्लक्ष, गुन्हा दाखल.
रिझवान हा Yousufguda च्या Sriram Nagar चा रहिवासी आहे. त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. दरम्यान रिझवानचा भाऊ Mohammed Khaja याने या प्रकरणी Banjara Hills पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे आणि याप्रकरणी उचित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.